Utpal Parrikar is determined to contest goa assembly elections 2022
Utpal Parrikar is determined to contest goa assembly elections 2022 Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकरांच्या सक्रीय निवडणूक प्रचाराचे भाजपवरही दडपण

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Former Goa CM Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी आगामी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) पणजी मतदारसंघातून (Panaji constituency) लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी या मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठी घेण्यासही सुरू केले आहे.

उत्पल पर्रीकर यांच्या सक्रीय निवडणूक प्रचारामुळे भाजपवरही दडपण आले आहे. त्यांनी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे पक्षाला माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारीचा चेंडू भाजपच्या कोर्टात टाकला आहे.

दीपावलीच्या पूर्वसंध्येला पणजी शहरातील काही रस्त्यांवर नरकासुर प्रतिमा पाहण्यासाठी वाहने घेऊन लोकांची गर्दी होत असल्याने त्यावर उपाय करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उत्पल पर्रीकर यांनी आल्तिनो-पणजी येथील वाहतूक पोलिस मुख्यालयाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उमेदवारी मिळणारच

पणजीतून निवडणूक लढविण्याबाबत माझा निर्णय ठाम आहे, याची कल्पना भाजपला यापूर्वीच दिली आहे. निवडणूक लढवण्याची माझी तसेच पणजीतील अनेक लोकांची इच्छा आहे. पक्षाकडून पणजी मतदारसंघातून मला उमेदवारी मिळेल याबाबत पूर्ण विश्‍वास आहे. पणजी मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम सुरू आहे. हे काम कोणत्या टप्प्यावर पोहचले आहे हे मी कसे काय सांगणार असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT