Goa Assembly Election: Utpal Parrikar and Uday Madakaikar Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: उत्‍पल-उदय आले एकत्र

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी पणजी मतदारसंघांमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी प्रत्यक्ष रणनीतीला सुरूवात केली आहे. विरोधी गटातील नेत्यांचा पाठिंबा मिळविण्‍याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले आहे. बाबूश मोन्सेरात गटाचे माजी महापौर आणि काँग्रेसचे पणजीतील इच्छुक उमेदवार उदय मडकईकर (Uday Madakaikar) यांची भेट घेतली. त्‍यांनीही आपला पाठिंबा असल्‍याचे सांगितले.(Utpal Parrikar and Uday Madakaikar came together for goa assembly elections)

भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांनी काल शुक्रवारी आपल्याला उदय मडकईकरच्या पाठिंब्याची गरज नसल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मडकईकर आज उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मडकईकर हे बाबूश मोन्सेरात गटाचे महापौर होते. त्यानंतर त्यांनी बाबूश मोन्सेरात यांच्यापासून फारकत घेत काँग्रेसमध्ये (Goa Congress) प्रवेश केला होता. तसेच विविध स्तरावर कामाचा धडका लावला होता.

मडकईकर पणजी मतदारसंघाचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार होते. मात्र या मतदारसंघांमधून काँग्रेसने एल्विस गोम्स यांना उमेदवारी दिल्याने मडकईकर नाराज आहेत. त्यामुळे ते उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता जास्त आहे.

पणजीतून (Panjim) अपक्ष निवडणूक लढवणे निश्चित केल्यानंतर अनेक पक्षांच्‍या नेत्‍यांकडून तसेच विविध स्‍तरावरील नागरिकांकडून आपल्‍याला मोठा पाठिंबा मिळत आहे. ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्या सर्वांचे स्वागत आहे. घरोघरी प्रचार आणि विविध स्तरातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. येत्या दोन दिवसांत याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल.

- उत्पल पर्रीकर,

पणजीचे अपक्ष उमेदवार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT