utpal parrikar and Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: उत्पल पर्रीकर, माजी मुख्यमंत्री पार्सेकरांच्या घरवापसीला ब्रेक? केंद्रीय नेतेच निर्णय घेणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Politics

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व उत्पल पर्रीकर यांना भाजपमध्ये फेरप्रवेश देण्याची प्रदेश पातळीवरील नेत्यांची मानसिकता नसल्याचे दिसते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हा विषय झटकत पर्रीकर व पार्सेकर हे भाजपपासून बऱ्याच काळापासून लांब आहेत. त्यांच्या घरवापसीसंदर्भात केंद्रीय नेतेच निर्णय घेऊ शकतात, असे उत्तर देत हा विषय गुंडाळला.

या दोन्ही नेत्यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर भाजपला सोडचिट्ठी दिली असली तरी त्यांनी संघपरिवाराच्या विचारांना तिलांजली दिलेली नाही. पार्सेकर यांना कॉंग्रेसमध्ये तर पर्रीकर यांना तृणमूल कॉंग्रेसमध्ये ओढण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आम्ही पक्ष सोडला तरी विचार सोडला नाही, असे ठाम उत्तर देत या दोन्ही नेत्यांनी भाजप सोडून अन्य पक्षात जाणार नसल्याचे दाखवून दिले होते.

विधानसभा निवडणुकीत पार्सेकर व पर्रीकर यांनी दमदार कामगिरी केली होती. पर्रीकर यांनी पक्ष संघटनेची मदत नसताना ६ हजार ७१ मते पणजीत मिळवली होती तर मांद्रेतून पार्सेकर यांनी ५ हजार ८११ मते मिळवली होती.

पर्रीकर यांना केवळ ७१६ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. एका बाजूला भाजप आणि बाबूश मोन्सेरात यांचे कार्यकर्ते विरोधात पर्रीकर यांचे मित्रमंडळ असा विषम सामना होता.

तरीही पर्रीकर यांनी चमकदार कामगिरी केल्याने पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांनी कामगिरी आणखीन सरस ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. त्यामुळे इतर नेत्यांप्रमाणे पर्रीकर यांच्यासाठी भाजप दरवाजे उघडेल काय, याविषयी उत्सुकता आहे.

पार्सेकर यांना उमेदवारी नाकारल्याने २२ जानेवारी २०२२ रोजी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती.

मात्र, सोपटे आणि पार्सेकर या दोघांचाही पराभव झाला होता. तब्बल ३२ वर्षे पक्षासाठी एकनिष्ठेने कार्य केल्यानंतर पार्सेकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. सध्या ते कोणत्याही पक्षात नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT