Goa GMC Road Dainik Gomantak
गोवा

GMC Goa: ‘गोमेकॉ’ समोरील रस्ते ‘व्हेंटिलेटर’वर! साबांखा’चे दुर्लक्ष; रुग्ण, गर्भवती आणि वृद्धांना नाहक त्रास

Goa Medical College Hospital: गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील रस्ते सध्या ‘व्हेंटिलेटर’ वर आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे गंभीर रुग्ण, गरोदर महिला आणि वृद्धांना नाहक त्रास होत असून वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होत आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्यासह संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील रस्ते सध्या ‘व्हेंटिलेटर’ वर आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे गंभीर रुग्ण, गरोदर महिला आणि वृद्धांना नाहक त्रास होत असून वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होत आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्यासह संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्ती करावा, अशी मागणी प्रवाशांसह वाहनचालकांची आहे.

बांबोळी येथील उड्डाणपुलाखालील अंडरपासचा रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहतूक करणाऱ्या रुग्णवाहिका आणि इतर वाहतूक करणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून हीच परिस्थिती असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.

अंडरपासच्या दोन्ही बाजूचा रस्ता वाहून गेल्याने येणाऱ्या रुग्णवाहिकांना मंदगतीने यावे लागते. त्यामुळे गंभीर असलेल्या रुग्णांसाठी धोका वाढतो, तसेच गरोदर महिलांना सुद्धा याच रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. वृध्द आणि इतरांसाठी देखील हा रस्ता डोकेदुखी ठरत आहे. हे सगळे होऊन देखील रस्त्यासंदर्भात काहीच उपाय केले जात नाहीत, त्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

रस्ता बनवण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असून अत्यावश्यक असलेल्या ‘गोमेकॉ’ बाहेर निकृष्ट दर्जाचे काम पाहणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई झालीच पाहिजे. उपचारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.

रस्ते बनवताना तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, कारण ‘गोमेकॉ’ येथे रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार हे नित्याचे झाले आहेत. रस्त्यावर पाणी साचणार नाही आणि पाणी जाण्यासाठी योग्य गटार व्यवस्था करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळेच खड्डे निर्माण होत आहेत. रस्ता बनवताना योग्यरीत्या निरीक्षण करून कंत्राटदारांकडून योग्य प्रकारे काम होते का? हे पाहणे गरजेचे आहे. परंतु रस्ता कामांचे परीक्षण होत नाही. त्यामुळेच असे रस्ते लवकर खराब होतात.
मिलिंद प्रभू , तज्ज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT