CM Sawant With sumnesh_joshi  Dainik Gomantak
गोवा

Aadhar Card : आधारकार्डात 14 जूनपर्यंत ऑनलाईन सुधारणा करा : जोशी

यूआयडीएआयच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री डॉ. सावंतांची भेट

दैनिक गोमन्तक डिजिटल

यूआयडीएआयच्या प्रादेशिक कार्यालयाचे डीडीजी सुमनेश जोशी यांनी नुकतीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. सध्या राबविल्या जाणाऱ्या आधार कार्ड सुधारणा मोहिमेविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

यावेळी जोशी यांनी माहिती देताना सांगितले , की ज्या नागरिकांना 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड मिळालेले आहे व जे त्याच पत्त्यावर राहत आहेत त्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची सूचना करण्यात आलेली आहे.

तसेच कागदपत्रांत सुधारणा करण्यासाठी पंचायत पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आले आहे. याशिवाय नागरीक ऑनलाईनही कागदपत्रांत विनाशुल्क 14 जून 2023 पर्यंत सुधारणा करू शकतात. गोमंतकीयांना या सुविधेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.

आधार नोंदणी पध्दती अधिक प्रभावी करणे, तसेच राज्य पोर्टलचा वापर करून १८ वर्षांवरील नवीन प्रौढ नोंदणी याविषयीही जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. तसेच त्यांनी एमआधारला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आधार क्यूआर कोडचा वापर याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोशी यांना सांगितले की, गोवा राज्य आधार आधारीत डीबीटीचा अवलंब करणार आहे आणि लाभार्थी परिचयासाठी आधार कार्ड

विश्‍वासार्हतेची पडताळणी केली जाणार आहे. तसेच एप्रिलमध्ये आधारच्या वापरासंबंधात कार्यशाळा किंवा चर्चासत्राचे आयोजन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जोशी यांना केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT