Sarzora Railway oppose Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: 'आमच्या गावांक कितें जाय ते आमी जाणां'; सरझोरातील प्रस्तावित रेल्वे स्थानकाला स्थानिकांकडून तीव्र विरोध

Sarzora Railway Project: सरझोरामधील रहिवाशांनी सोमवारी रस्त्यावर उतरत प्रस्तावित रेल्वे स्थानकाला तीव्र विरोध केला

Akshata Chhatre

सरझोरा: गोव्यात नव्याने तीन रेल्वे स्थानक होणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावर होणाऱ्या या नव्या स्थानकांमुळे प्रवाशांना फायदा होणार असला तरी आता या स्थानकांना राज्यातून विरोध होत आहे. सरझोरामधील रहिवाशांनी सोमवारी (१० फेब्रुवारी) रोजी रस्त्यावर उतरत प्रस्तावित रेल्वे स्थानकाला तीव्र विरोध केला.

सरपंच लिओना फर्नांडिस आणि इतर पंचायत सदस्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनात गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय परिणामाबद्दल आणि त्यांना होणाऱ्या त्रासांबद्दल चिंता व्यक्त केली. स्थानिकांच्या मते सरझोरा हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे, ज्यात वन्यजीवांचे महत्त्वपूर्ण अधिवास आहे तसेच उत्पादक शेतजमीन यामुळे या ठिकाणच्या नेहमीच जैवविविधता जपली आहे आणि अशा प्रकारचे प्रकल्प त्यात बाधा आणू शकतात, पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते.

स्थानिकांनी वेळीचे आमदार आमदार क्रुझ सिल्वा यांना गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून रेल्वे स्टेशनच्या बांधकामाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. या प्रस्तापित प्रकल्पाचा विरोध करतनाच स्थानिकांनी त्यांच्या गरजांकडे अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षावर लक्ष वेधून घेतलं, स्थानिकांच्या मते ते वारंवार रेल्वेस्थानकावरील क्रॉसिंगवर ओव्हर ब्रिड्ज बांधण्याची विनंती करत आहेत मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाहीये.

आपला विरोध हा प्रगती नाकारण्याचा नसून जबाबदार विकासाची मागणी करत असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. पर्यावरणाला आणि सरझोराच्या गावाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून नेमच आवाज उठवला जाईल असे ग्रामस्थ म्हणाले आहेत.

समाजाच्या एकतेशी आणि पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं ते म्हणालेत आणि म्हणूनच त्यांच्या गरज लक्षात घेऊन आवश्यक बदल करावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

गोव्यात कोकण रेल्वेच्या मार्गावरुन कोळसा वाहतूक होणार नाही

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी गोव्यात नेवरा, सारझोरा आणि मये या ठिकाणी तीन नवीन रेल्वे स्थानक जाहीर करण्यात आली आहेत. नव्या रेल्वे स्थानकांना सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी विरोध दर्शवला. स्थानिकांचा विरोध होत असताना नव्याने स्थानक उभारण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल आपचे आमदार सिल्वा यांनी उपस्थित केला. तसेच, जे हवं ते देण्याऐवजी नको ते का माथी मारले जात आहे, असेही सिल्वा म्हणाले. शिवाय कोळसा वाहतूक आणि इतर प्रदूषण संबधित वस्तूंच्या वाहतुकीची शंका त्यांनी उपस्थित केली, मात्र या प्रश्नांवर बोलताना गोव्यात कोकण रेल्वेच्या मार्गावरुन कोळसा वाहतूक होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT