Santosh Kumar Sawant Dainik Gomantak
गोवा

स्वाभिमानी मयेकर भाजपला चांगलाच धडा शिकवतील: संतोषकुमार सावंत

मये मतदारसंघात भाजपला पराभवाची चाहूल; भाजपची पैशाच्या बळाचा वापर करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त युक्ती

दैनिक गोमन्तक

Goa Elections Update: परवा पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे सर्वांचीच उत्कंठा वाढली आहे. गेल्या काही दिवसात अनेक राष्ट्रीय नेते केंद्रातून गोव्यात प्रचारासाठी दाखल झाले आहेत. यादरम्यान पक्षनेते एकमेकांवर सडकून टीका, आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवूनही कॉंग्रेसची सत्ता स्थापन झाली नाही. यावेळी कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती करून ही निवडणूक (Goa Elections 2022) लढवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड पार्टीतर्फे भाजपवर निशाणा साधण्यात आला. (Santosh Kumar Sawant News Updates)

मये मतदारसंघात भाजपला पराभवाची चाहूल लागली आहे, त्यामुळे त्यांनी पैशाच्या बळाचा वापर करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त युक्ती अवलंबली आहे. स्वाभिमानी मयेकर भाजपला चांगलाच धडा शिकवतील. आता फक्त अवघ्या काही काळाची बाब आहे, भाजपचा पराभव निश्चित आहे, असे मत GFP उमेदवार संतोषकुमार सावंत यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, कॉंग्रेस आणि भाजपमध्ये या निवडणुकीत चुरशीची लढत दिसून येत आहे. पण यावेळी जनता नेमकी कुणाच्या बाजूने असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT