unseasonal rain goa panaji heavy showers
पणजी: राज्यात सध्या अवकाळी पावसाने धूमशान घातले आहे. सोमवारी (7 एप्रिल) संध्याकाळी पुन्हा एकदा राजधानी पणजीसह अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाने सकाळीच येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह कोसळधार बरसणार असल्याची शक्यता वर्तवली होती. मागील काही दिवसांत राज्यात सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या गोमंतकीयांना पावसाने काहीसा दिलासा दिला.
दरम्यान, राज्याला सोमवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. पणजी, सत्तरी, डिचोली, बांबोळीसह अनेक भागात सध्या पडत असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. पावसाने या भागात अक्षरश: दाणादाण उडवली. मेघगर्जनेसह पावसाची दमदार बॅटिंग सध्या सुरु आहे. दुसरीकडे मात्र, मागील काही दिवसांपासून सत्तरीसह डिचोलीत सातत्याने पाऊस पडत असल्याने या भागातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवारी (5 एप्रिल) पेडणे, सत्तरी, केपे आणि काणकोण या भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांत झाडांची पडझड पाहायला मिळाली. विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.