वाळपई: हवामान खात्याने पावसाची शक्यता दर्शवली असतानाच आज दुपारी २.३० च्या सुमारास वाळपईसह सत्तरीतील अनेक भागांत अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी काही प्रमाणात विजेचा गडगडाट होत होता. दुपारच्या वेळी अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली.
नाणूस-वाळपई येथे जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सत्तरीच्या काही भागांत अधून मधून पाऊस पडत होता. तसेच उष्माही खूप वाढला होता. या वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते.
शनिवारी (०५ एप्रिल) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आणि दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर सुरूच होता. पहिल्या पावसातच शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे अनेकजण अडकून पडले.
चक्रीवाऱ्यांमुळे धो धो बरसला पणजी
मध्य प्रदेश आणि तामिळनाडू परिसरात समुद्रसपाटीजवळ चक्रिय वारे घोंघावत आहे. या वाऱ्याच्या प्रभावातून शनिवारी राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार शनिवारी सत्तरी तालुक्यात तसेच साखळी येथे दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
शनिवारी सकाळपासून राज्यात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता. रविवारपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात उष्मा वाढण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.