Our Lady of Lourdes High School Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: फुटपाथवर गाड्या आणि रस्त्यावर माणसे! वाळपईत अजब प्रकार; बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

Our Lady of Lourdes High School Valpoi: वाळपई येथील अवर लेडी ऑफ लुर्डस् हायस्कूलसमोरील रस्त्यावरील फुटपाथवर बेशिस्त दुचाकी वाहने पार्किंग केली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: येथील अवर लेडी ऑफ लुर्डस् हायस्कूलसमोरील रस्त्यावरील फुटपाथवर बेशिस्त दुचाकी वाहने पार्किंग केली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

्विद्यार्थ्यांना फुटपाथ ऐवजी रस्त्यावरून चालत जावे लागते, त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत अवर लेडी हायस्कूलच्या व्यवस्थापनाने चिंता व्यक्त करून यात सुधारणा घडवून आणण्याची मागणी केली आहे.

अवर लेडी विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर रॉबर्ट फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या व्यवस्थापनाने या प्रकाराला तीव्र हरकत घेतली आहे. तसेच फुटपाथ विद्यार्थी व पादचाऱ्यांसाठी खुली ठेवण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व कडक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोंडीचा त्रास

वाळपई शहरात पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेकजण येथील मुख्य रस्त्यांच्या बाजूला अथवा फुटपाथवर आपली वाहने पार्क करतात. अवर लेडी ऑफ लुर्डस् हायस्कूलसमोरील रस्त्यावरील फुटपाथवर अनेकजण बेशिस्त पार्किंग करतात, त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचेही प्रकार घडतात. त्यात विद्यार्थीही अडकतात.

पालिका प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी

शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला वाहन पार्क करण्यावर जोपर्यंत प्रशासन बंदी आणत नाहीत तोवर येथील वाहतुकीला शिस्त लागणे कठीण आहे. निदान फुटपाथ तरी चालत जाणाऱ्यांसाठी मोकळ्या सोडणे आवश्‍यक आहे. पालिका प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेणे आवश्‍यक आहे, असे पादचारी व पालकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

Viral Video: बड्या नेत्याचा साधेपणा की राजकीय स्टंट? खासदारसाहेब बनले 'डिलिव्हरी बॉय', ब्लिंकिटचा युनिफॉर्म घालून घरोघरी पोहोचवलं पार्सल

शेतीची जमीन अन् क्लबचा धंदा; हणजूण येथील 'त्या' क्लबला प्रशासनाचा दणका, ठोठावला 15 लाखांचा दंड

Goa Winter Session: विधानसभेत एक मिनिटाचे मौन! शिरगाव आणि हडफडे दुर्गटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली

Goa Crime: मुंगुल गँग वॉरचा आरोपी आता 'पोक्सो'च्या कचाट्यात! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी कुख्यात अमर कुलालच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT