BJP Dainik Gomantak
गोवा

पेच कायम! शपथविधी लांबणीमुळे भाजपामध्ये अस्वस्थता

पक्षश्रेष्ठींचे मत: होळीनंतरच चारही राज्यांतील निर्णय प्रक्रिया

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपने सत्ता संपादन केलेल्या चार राज्यातील मंत्रिमंडळाचा शपथविधी होळीनंतर व्हावा, या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाबद्दल भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधानसभेची मुदत 16 मार्च रोजी संपुष्टात येत असून सध्या प्रमोद सावंत काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. होळी 17 तारखेला येत असून 16 तारखेपूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हावा, असे स्थानिक नेत्यांना वाटते. परंतु, केंद्रीय नेत्यांनी होळीनंतरच गोव्यात मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, असे स्थानिकांना सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे.

विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी शपथविधी आवश्‍यक असतो. त्यानंतर शपथविधी होऊ शकतो का? या संदर्भात आम्ही घटनातज्ज्ञांशी चर्चा केली आहे, अशी माहिती भाजपच्या सुकाणू समितीच्या ज्येष्ठ सदस्याने ‘गोमन्तक’ला दिली. पक्षसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत काळजीवाहू मुख्यमंत्री बनल्यानंतर ताबडतोबीने नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची आवश्‍यकता नाही. दरम्यान, दुसरीकडे मणिपूरचे भाजप मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी पदाचा राजीनामा शुक्रवारी सादर केला. राज्यातील नवे सरकार १९ मार्चपूर्वी सत्तेवर येईलव व्या मुख्यमंत्र्याची घोषणा एक-दोन दिवसांत होईल असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत केंद्राचे सूचक मौन

मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत केंद्राकडून सूचक मौन बाळगण्यात आले आहे. होळीनंतरच ही प्रक्रिया सुरू करण्याच्या केद्राच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ सदस्यामध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याबद्दल अनुकूलता आहे. पण त्यांचीच रितसर निवड होऊ द्या, मंत्रिमंडळ सदस्य व त्यांच्या खात्याबद्दल नंतरच विचार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया एका जेष्ठ सदस्याने ‘गोमन्तक’ला दिली.

सत्ताधारी पक्षात ‘सामसूम’

निवडणुकीत 20 जागा संपादन केल्यानतर ताबडतोडीने नवे सरकार स्थापन केले जाऊ शकत होते. त्यावेळी गोव्यात प्रभारी देवेंद्र फडणवीस, किशन रेड्डी, सी. टी. रवी हे नेते उपस्थित होते. परंतु त्यांना नेता निवडीची पुढची प्रक्रिया सुरू करण्यास मनाई करण्यात आली. मात्र, गेले दोन दिवस आमदार विविध ठिकाणी परस्पर भेटतात आणि सत्ताधारी पक्षात ‘सामसूम’ निर्माण झाली आहे.

केंद्र आणि राज्यातील नेत्यांमध्ये मतभिन्नता

होळीमुळे चारही राज्यात एकाच वेळी शपथविधी व्हावा अशी पक्षश्रेष्टींची धारणा आहे. याउलट गोव्यातील नेत्यांना वाटते. धुलीवंदनानंतर पुढचे सहा-सात दिवस अशुभ मानले जातात. त्यामुळे त्या आधीच शपथविधी उरकावा. पक्षश्रेष्ठींच्या मते शपथविधीपूर्वी हंगामी सभापती नियुक्त करून आमदारांना शपथ द्यायला पाहिजे.

राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चा

मुख्यमंत्रिपदावरील व्यक्ती निवडणूक हरली, तरच ते आपला राजीनामा राज्यापालांकडे देतात. मात्र, प्राप्त परिस्थितीत त्यांना राजीनामा का द्यावा लागला? याबद्दल सत्ताधारी पक्षात उलटसुलट चर्चा चालू आहे. होळीनंतरच राज्यात नवीन सरकार स्थापन करावे. या केंद्राच्या भूमिकेबद्दलही राज्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

SCROLL FOR NEXT