Gujrat Tourist Death in Goa Dainik Gomantak
गोवा

Gujrat Tourist Death: झोपेतून उठून त्याने मदतीसाठी हाक दिली अन् तिथेच कोसळला! पर्यटकाचा हॉटेल रूममध्ये मृत्यू...

पोलीस सदर घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Kavya Powar

Gujrat Tourist Death in Goa: गोव्यात देशी-विदेशी पर्यटक फिरण्यासाठी दाखल होत असतात. अनेकदा त्यांच्याबाबतीतले गैरप्रकार समोर येत असतात. गुजरातमधील एका पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे. तिथल्या एका हॉटेलमध्ये राहत असलेल्या मूळ गुजरात येथील एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

राठोड मलकेश कुमार (32) असे मृतकाचे नाव आहे. हॉटेलमधील एक खोलीत झोपेतून जागा झाल्यानंतर अचानक त्याने मदतीसाठी मोठ्या आवाजात हाक दिली. त्यानंतर तो तिथेच कोसळला.

दरम्यान, त्याला त्वरित दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस सदर घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT