Goa Water Supply Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्को येथे घरातील पाण्याचे मिटर अज्ञात चोरट्यांनी केले लंपास

सदर पाण्याचे मिटर 40 ते 45 वर्षापुर्वीचे असल्याची माहिती नवेवाडे परिसरातील घरमालकांनी दिली आहे. पाण्याचे मिटर चोरी प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा विभागाचे नवेवाडे भागातील अंदाजे पाच घरातील पाण्याचे मिटर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. यामुळे पुन्हा एकदा वास्को - नवेवाडेत चोरांनी धुमाकूळ माजविला आहे. सदर पाण्याचे मिटर 40 ते 45 वर्षापुर्वीचे असल्याची माहिती नवेवाडे परिसरातील घरमालकांनी दिली आहे. पाण्याचे मिटर चोरी प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

(water meter in Vasco)

वास्को नवेवाडे मुरगाव नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग २२ मधील पाच घरातील पितळेचे धातूचे पाच पाण्याचे मिटर अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. चोरी प्रकरणी घरमालकांनी सर्व प्रथम वास्को पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच वास्को बायणा येथील सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा विभाग मध्ये पाण्याचे मीटर चोरीला गेले असल्याची तक्रार दाखल केली आहे.

सदर नवीन पाण्याचे मिटर पुढील आठवड्यात चोरीला गेलेल्या घरमालकांच्या नळाला जोडून देणार अशी माहीती विभागा मार्फत देण्यात आली आहे. वास्को पोलिसांनी पाण्याचे मिटर चोरी प्रकरणी लवकर छडा लावावा अशी मागणी नवेवाडेतील नागरीकानी केली आहे. वास्को पोलिस पितळेचे पाण्याच्या मीटर चोरी प्रकरणी अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT