Male Dead Body Found on Baina Beach Dainik Gomantak
गोवा

Dead Body on Baina Beach: बायणा समुद्रकिनाऱ्यावर आढळला अज्ञात मृतदेह! स्थानिकांंनी व्यक्त केला 'हा' संशय

बायणा समुद्रकिनाऱ्यावर काल (सोमवार) अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

Kavya Powar

Male Dead Body Found on Baina Beach

बायणा समुद्रकिनाऱ्यावर काल (सोमवार) अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह शव विच्छेदनासाठी मडगाव हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. मडगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक स्टेनली गोम्स या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी बायणा समुद्रकिनाऱ्यावर एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर व्यक्तीने समुद्रात उडी घेत आपले जीवन संपवले, असा संशय स्थानिकांंनी व्यक्त केला आहे.

मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर समुद्रकिनारी उभ्या असलेल्या नाल्याजवळ कपडे आणि इतर वस्तू दिसल्या असून त्या मृत व्यक्तीच्या असल्याचा दावा स्थानिकांनी केला.

समुद्रकिनाऱ्यावर चालत असताना एका व्यक्तीने पाण्यात तरंगत असलेला मृतदेह पाहिला होता. त्याने परिसरातील लोकांना याची माहिती दिली आणि त्वरित पोलिसांना कळवले. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT