Goa Daily News Wrap: इफ्फीचा समारोप, सारमानस अपघात ; वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

Goa Breaking News 28 November 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच गोव्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज
Goa Live Update 28 November 2023
Goa Live Update 28 November 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

सारमानस फेरीधक्क्यावर अपघात, कारचालकाचा मृत्यू

सारमानस फेरीधक्क्यावर अपघात झाला असून, कार थेट नदीपात्रात गेल्याने कारचालकाचा मृत्यू झाला आहे. तर यात एकाच कुटुंबातील तिघेजण बचावले आहेत. तर डिचोलीतील कारचालकाचा यात मृत्यू झाला आहे.

मायकल डग्लस सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

हॉलिवूड अभिनेते हॉलीवूड अभिनेते मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते सहकुटुंब पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.

'एन्डलेस बॉर्डर्स' चित्रपटाला मानाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार

एन्डलेस बॉर्डर्स या चित्रपटाला इफ्फीमध्ये दिला जाणारा प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी 15 चित्रपटांची निवड झाली होती. यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश होता.

'ड्रिफ्ट' ला आयसीएफटी गांधी मेडल

आयसीएफटी गांधी मेडल स्पर्धेत अँथनी चेन दिग्दर्शित 'ड्रिफ्ट' सिनेमाला पारितोषिक. जगभरातील १० चित्रपट होते स्पर्धेत.

पंचायत २ उत्कृष्ट वेबसिरीज

इफ्फीत यंदा सुरु करण्यात आलेल्या उत्कृष्ट वेबसिरीजचा पहिला पुरस्कार पंचायत सिझन २ ला जाहीर.

अभिनेता ऋषभ शेट्टीला कांतारासाठी स्पेशल ज्युरी पुरस्कार

Kantara | Rishab Shetty
Kantara | Rishab ShettyPIB

कांतारा प्रेक्षकांना का आवडला? अभिनेता, निर्माता ऋषभ शेट्टीने सांगितले कारण...

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते ऋषभ शेट्टी यांनी आज गोव्यामध्ये आयोजित  54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) आयोजित संवाद सत्रात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

कन्नड चित्रपट सृष्टीचे प्रतिनिधित्त्व करणारे ऋषभ शेट्टी, हे कांतारा या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. कांतारा हा चित्रपट इफ्फी 54 मधील प्रतिष्ठेच्या गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठी यंदाच्या 15 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या तीन भारतीय चित्रपटांपैकी एक आहे.

हॉलिवूड स्टार मायकल डग्लस 'नाटू नाटू' वर थिरकले, बिग बींचा डायलॉगही बोलला; पाहा व्हिडिओ

हॉलिवूड मायकल डग्लस यांना ५४ व्या इफ्फीत सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. डग्लस यांनी मंगळवारी कला अकादमी येथे आयोजित मास्टरक्लासला हजेरी लावली. यात डग्लस यांनी त्यांचा अभिनय प्रवास आणि जागतिक सिनेमाबाबत भाष्य केले.

संवादादरम्यान, डग्लस यांनी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध डायलॉग बोलून दाखवला आणि नाटू नाटू गाण्यावर देखील थिरकले.

भावाचे प्रकरण भोवणार? आमदार वीरेश बोरकर यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार

सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या साळगावकर यांनी मंगळवारी सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्या विरोधात गोवा राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. बोरकर यांचे बंधू साईश बोरकर व इतर दोघांनी छळ केल्याची तक्रार एका महिलेने आगशी पोलिसात दाखल केली आहे.

याप्रकरणी आमदार बोरकरांनी तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप ऐश्वर्या साळगावकर यांनी तक्रारीद्वारे केला आहे.

आप नेते अरविंद केजरीवाल यांना म्हापसा कोर्टाचे समन्स

जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी दाखल केलेल्या निवडणूक आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हापसा कोर्टातर्फे समन्स बजावण्यात आले आहे.

गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; दिशा नाईक ठरली पहिला महिला फायरफायटर

गोव्यातील दिशा नाईक ही युवती देशातील पहिली प्रमाणित महिला फायरफायटर ठरली आहे. ती अग्निशमन बंबावर काम करेल. गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्या कार्यरत असणार आहेत.

हॉलिवू़ड अभिनेते मायकल डग्लस यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल यांची घेतली भेट.

मायकल डग्लस
मायकल डग्लसDainik Gomantak

कुडचडेत महिलेने इमारतीवरून मारली उडी  

कारियामोड्डी कुडचडे येथील अनिता फर्नांडिस (54) यांनी राहत्या इमारतीवरून आज (28 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजता उडी मारली. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत

भाटलेत सिलिंडरचा स्फोट

भाटले येथील मशिदी जवळील सरकारी वसाहतीमध्ये आज (28 नोव्हेंबर) मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

दरम्यान, यामध्ये किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकलेले नाही.

गोव्यावर 31758 कोटी रूपये कर्ज; 20 वर्षात थकबाकीत 618 टक्के वाढ

गोवा सरकारला वार्षिक खर्च, सामाजिक योजना आणि पायाभूत विकासावरील खर्च याची हातमिळवणी करण्यासाठी महसूल मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यातून गोवा राज्याची एकूण वित्तीय तूट 2004-05 पासून 680 टक्क्यांनी वाढली आहे.

ही तूट भरून काढण्यासाठी, राज्याला कर्जावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे राज्याच्या कर्जाची थकबाकी तब्बल 31 हजार कोटींवर गेली आहे. 2005 मध्ये ही थकबाकी 4417 कोटी रुपये होती ती 2023 मध्ये 31758 कोटी रुपये झाली झाली आहे. ही वाढ तब्बल 618 टक्के इतकी आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, जवळपास दोन दशकांच्या कालावधीत गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारही वाढल्याचे त्यातून दिसून येते.

'इफ्फी'मध्ये आज, मंगळवारी हॉलीवूड अभिनेता मायकल डग्लस साधणार संवाद, क्लोजिंग फिल्म 'फिदरवेट'चे आकर्षण

गोव्यात 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज, मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी समारोप होत आहे. आज महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी हॉलीवूड अभिनेता मायकल डग्लस हे इन कॉन्व्हर्सेशन या संवाद सत्रात उपस्थित राहणार आहेत.

मॅक्विनेझ पॅलेस

सकाळी 9 ---- कोरस

सकाळी 11.40 ---- श्यामची आई

अशोका ऑडी

सकाळी 10 ---- इराट्टा

दुपारी 2 ---- कांतारा

सम्राट ऑडी

सकाळी 10 ----- सिंगो

कला अकादमी

सकाळी 11.30 ---- इन कॉन्व्हर्सेशन ---- विषय- इज इट टाईम फॉर वन वर्ल्ड सिनेमा ---- सहभाग - मायकल डग्लस, शैलेंद्र सिंग

आयनॉक्स पणजी

सकाळी 9 ---- वुमन ऑफ ---- आयनॉक्स स्क्रीन 1

सकाळी 9.15 ---- विस्टा मेअर---- आयनॉक्स स्क्रीन 3

सकाळी 9.30----- ट्वेंटी 20 ---- आयनॉक्स स्क्रीन 4

सकाळी 10 ---- कांतारा ---- आयनॉक्स स्क्रीन 2

सकाळी 11.00 ---- ओमेन ---- आयनॉक्स स्क्रीन 1

सकाळी 11.45 ---- लिटल सिंघम बाहुबली फ्रेंड्स ---- आयनॉक्स स्क्रीन 3

सकाळी 11.50 ---- एंडलेस समर सिंड्रोम ---- आयनॉक्स स्क्रीन 4

दुपारी 2 ---- द फिदरवेट ---- आयनॉक्स स्क्रीन 1

दुपारी 2 ---- द फिदरवेट ---- आयनॉक्स स्क्रीन 2

दुपारी 2 ---- द फिदरवेट ---- आयनॉक्स स्क्रीन 3

दुपारी 2 ---- द फिदरवेट ---- आयनॉक्स स्क्रीन 4

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com