dead body found in Madgaon Dainik Gomantak
गोवा

बेवारस बसमध्ये सापडला कुजलेला मृतदेह

सदर मृतदेह कुणा भिकाऱ्याचा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मडगावातील मध्यवर्ती भागात एका बसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. क्लब हार्मोनियाच्या समोर बेवारसरित्या सोडून दिलेल्या एका बसमध्ये आज हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. सदर मृतदेह कुणा भिकाऱ्याचा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मयत व्यक्तीचा दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाजही व्यक्त करण्यात आला. या बसमधून दुर्गंधी येऊ लागल्यावर त्या भागातील लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. सदर मृतदेह बसच्या सीटच्या पोकळीत अडकून पडल्याने शेवटी अग्निशमन दलाच्या मदतीने ही सीट कापून काढून तो बाहेर काढण्यात आला. हे सगळे बराच वेळ चालू असल्याने तिथे बघ्यांची गर्दी वाढली होती. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

दुसरीकडे सत्तरी तालुक्यातील पर्ये गावातील सुजाता नाईक (31) या महिलेने पाच वर्षांचा चिमुकला तेजस याच्यासह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली होती.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह मिरामार समुद्र किनाऱ्यावर स्थानिकांना दिसला. त्यांनी पोलिसांना संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉच्या शवागारात पाठवला. तर शनिवारी दुपारनंतर एका पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह जुने गोवे पोलिसांना मिळाल्याची माहिती वायरलेसद्वारे सर्व पोलिस स्थानकांना पाठवण्यात आली. या घटनेनंतर वाळपई पोलिस स्थानकात आई आणि तिचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार शुक्रवारी आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, मिरामार येथे मृतदेह सापडलेली महिला सुजाता नाईक आणि जुने गोवे येथे सापडलेला मुलाचा मृतदेह तिचा मुलगा तेजस याचा असल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

Goa Live Updates: नीता कांदोळकर यांनी दिला सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा!

SCROLL FOR NEXT