दिंड्यांना भेट gomantak digital team
गोवा

Ponda News : विठ्ठल भक्तांचा अनोखा उपक्रम!

दिंड्यांना भेट ः नामस्मरण, प्रबोधनातून साधला वारकऱ्यांशी संवाद

Ganeshprasad Gogate, गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा : पंढरीच्या पांडुरंगांच्या ओढीने चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना भेटून त्यांच्यासोबत नामदिंडीत सहभागी होणे, नामस्मरण करणे, वारकऱ्यांचे पाय चेपून त्यांची सेवा करणे आणि प्रबोधनातून पंढरपूरच्या वारीचे महत्त्व पटवून देण्यासाठी फोंड्यातील गोमंतक संत मंडळाचे पदाधिकारी आणि काही विठ्ठल भक्तांनी काल एका दिवसाची वारी केली.

फोंड्याहून निघालेल्या या मंडळाचे पदाधिकारी आणि विठ्ठलभक्तांनी दोडामार्ग, तिळारी मार्गे कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत जाऊन आपली एका दिवसाची सेवा वारकऱ्यांना समर्पित केली. यावेळी कीर्तनकार सुहास वझेबुवा, देवानंद सुर्लकर, राजेंद्र गावडे, संतोष कुर्टीकर, विष्णू गवस, दत्ता मावजेकर, मनोज वझे, रवींद्र कामत, रामदास वळवईकर, किशोर गावडे, पत्रकार सदानंद सतरकर व नरेंद्र तारी यांच्यासमवेत मनिषा दामले, प्रभावती वझे, रचना वळवईकर, भक्ती वळवईकर व इतरांनी या एका दिवसाच्या वारीत सहभागी होऊन वारीचा आनंद लुटला.

या वारीत प्रबोधनात्मक उपक्रम साकारताना पंढरपूरच्या वारीचे महत्त्व तसेच आजची समाज व्यवस्था आणि कला संस्कृतीचे रक्षण व मुलांवरील संस्कार आदीसंबंधीची माहिती वारकऱ्यांना देण्यात आली. कीर्तनकार सुहास वझेबुवा यांनी नामस्मरण दिंडीत गायन तसेच वादन केले. पंढरपूरच्या वाटेवरील आठ दिंडी पथकांना भेटून ही सेवा करण्यात आली. त्यात दिंडीतील वारकरीही सहभागी झाले होते.

एका दिवसाची वारी!

पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची संख्या सुरवातीला सीमित होती, पण आता वारकरी आणि दिंड्यांची संख्याही वाढली आहे. पंढरपूरला एका दिवसाची वारी करून वारकरी थांबतात, आणि पुढील वर्षाची वाट पाहतात, पण पंढरपूरच्या वारीप्रमाणे जर गोव्यातही विविध ठिकाणी वारकऱ्यांनी एका दिवसाची तीन ते चार महिन्यांनी वारी काढली.

किमान वीस किलोमीटर वारकरी तसेच महिला आणि मुलांच्या सहभागाने एखाद्या मंदिरापासून पाया वारी सुरू केली, वाटेतील मंदिरांत नामस्मरण, भक्ती महोत्सव, दिंडी, प्रवचन, प्रबोधन आदीसारखे प्रकार हाती घेतले तर पुढील पिढीपर्यंत ही वारी सशक्तपणे आपण पोचवू शकू आणि परमेश्‍वराचीही भक्ती साधू शकू, असे कीर्तनकार सुहास वझेबुवा यांनी आपल्या प्रबोधनात यावेळी वारकऱ्यांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

Goa Live Updates: नीता कांदोळकर यांनी दिला सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा!

SCROLL FOR NEXT