Union Minister Shripad Naik while felicitating Govind Gawde. Dainik Gomantak
गोवा

Bardez : तरुणांनी महापुरुषांच्या कार्याचा अभ्यास करून यशस्वी व्हावे ; गोविंद गावडे

गोमन्तक डिजिटल टीम

Bardez : आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ माता यांच्या कार्याची माहिती असणे गरजेचे आहे. जिजाऊ मातेने त्यांना दिलेली शिकवण ही फार महत्त्वाची आहे. त्याचा अभ्यास युवकांनी करावा व आपले जीवन यशस्वी करावे, असे आवाहन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले.

म्हापसा येथील हनुमान नाट्यगृहात आयोजित नाट्य महोत्सव उद्‍घाटन समारंभावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. हा नाट्यमहोत्सव स्व. मारुती नाटेकर समिती व बहुजन महासंघ यांच्यातर्फे घेण्यात आला. व्यासपीठावर केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, बहुजन समाज संघाचे अध्यक्ष अनिल होबळे, विश्वनाथ हळर्णकर, जयंत नाटेकर आदी उपस्थित होते. होबळे यांनी महासंघाच्या कार्याबद्दल माहिती करून दिली. सखाराम कोरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सतीश कोरगावकर तर अक्षता वाडेकर यांनी आभार मानले.

‘येथे ओशाळला मृत्यू’चे सादरीकरण

कार्यक्रमात नाईक यांच्या हस्ते मंत्री गावडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अर्जुन नाईक, ॲड. जयप्रकाश नाईक, श्रीप्रसाद वळवईकर यांनाही गौरविण्यात आले. उद्‍घाटन सोहळ्यानंतर ‘येथे ओशाळला मृत्यू’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. यामध्ये गोविंद गावडे यांनी संभाजीची भूमिका साकारली होती.

समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब नाटकातून दिसते. नाट्य महोत्सवातून नवी पिढी तयार होते. बहुजन महासंघ अनेक वर्षांपासून वंचितांसाठी काम करत आहे. त्याचबरोबर त्यांनी या सारख्या समाजाभिमूख महोत्सवांनाही आपले योगदान दिले आहे.

- श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

SCROLL FOR NEXT