Mapusa Crime: नेपाळी सुरक्षारक्षकांच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

संबंधित मृत नबिन बीके ही व्यक्ती पहाटे 3 वाजता एका अज्ञात व्यक्तीसोबत आढळून आली.
Mapusa Crime
Mapusa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Crime म्हापसा बोडगिणी येथे एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची खबर पोलिसांना शनिवारी मिळाली होती. या मृतदेहाच्या गळ्यावर बाटलीच्या काचेने वार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या घटनेच्या तपासाअंती पोलिसांनी आज संशयित करण शिंदे नामक 19 वर्षीय तरुणाला अटक केलीय.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी म्हापसा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना असे आढळून आले की, संबंधित मृत नबिन बीके (रा. नेपाळ) ही व्यक्ती पहाटे 3 वाजता एका अज्ञात व्यक्तीसोबत आढळून आली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे म्हापसा पोलिसांनी संशयित तरुणाचा शोध सुरु केल्यावर अखेर आज 17 एप्रिल रोजी करण महादेव शिंदे नामक 19 वर्षीय तरुणाला अटक केलीय.

करण शिंदेची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. यावेळी त्याने असे सांगितले की, शनिवारी पहाटे मयताला भेटल्यावर त्यांनी दारू पिण्याचे ठरवले.

याच दरम्यान त्यांच्यात अचानक भांडण सुरू झाले. त्यावेळी आरोपीने नबिन यांच्या मानेवर आणि गळ्यावर तुटलेल्या काचेच्या बाटलीने वार केल्याचे शिंदे याने पोलिसांना सांगितले.

Mapusa Crime
Verna News : पहिल्या अत्याधुनिक पोलिस नियंत्रण केबिनचे उद्‌घाटन

या तपास कामात पर्वरी एसपी (नॉर्थ) श्री, निधिन वालसन आयपीएस, एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी, यांच्या देखरेखीखाली पीआय परेश नाईक म्हापसा पीएसआय सुनील पाटील, पीएसआय विराज कोरगावकर, पीएसआय बबलो परब, हेडकॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, आनंद राठोड, अक्षय पाटील आणि राजेश कांदोळकर यांनी सहभाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Woman Cheated 33 lakhs
together for mhapsa complaint samuel braganza suicide case
Mapusa Youth Suicide
Neighbor Dispute Assault Mapusa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com