Union Minister Shripad Naik Reviewed preparations for Global Maritime India Summit 2023 Dainik Gomantak
गोवा

Global Maritime India Summit 2023: विश्व सागरी भारत परिषद; श्रीपाद नाईकांनी घेतला तयारीचा आढावा

मुंबईतील एमएमआरडीए मैदानाला भेट

दैनिक गोमन्तक

Global Maritime India Summit 2023: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी (ता.६) ‘विश्व सागरी भारत परिषद २०२३’चे केंद्र मुंबईतील एमएमआरडीए मैदानाला भेट देऊन परिषदेच्या तयारीचा आढावा घेतला. भारत सरकारच्या बंदर, जहाजोद्योग व जलवाहतूक मंत्रालयातर्फे या परिषदेचे आयोजन होणार आहे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर या भव्य परिषदेची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांनी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन राजीव जलोटा, आएएस आणि अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एकूण तयारीचा घेतला.

तीन दिवस होणाऱ्या या परिषदेला ५० हजारांपेक्षा अधिक पाहुणे भेट देतील, असा अंदाज असून ४०० पेक्षा अधिक परदेशी गुंतवणूकदार आणि प्रतिनिधींचा या परिषदेत सहभाग अपेक्षित आहे.

तत्पूर्वी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दक्षिण आशियातील सर्वात भव्य गणल्या जाणाऱ्या ‘ईनमॅक्स’ प्रदर्शनानिमित्त मुंबई एग्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमाला नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते.

७० हून अधिक देश

१७ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत ७० पेक्षा अधिक देश सहभागी होणार असून ४० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय आणि ५० पेक्षा अधिक राष्ट्रीय वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या वर्षातील समुद्री क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम मानल्या जाणाऱ्या या परिषदेत १५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रदर्शक सहभागी होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT