Thivim Railway  Dainik Gomantak
गोवा

Thivim Railway Accident: थिवीत रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, कोकण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरु; अपघाताचे गूढ कायम?

Thivim Station Accident: थिवी येथे रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. शनिवारी (11 ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली.

Manish Jadhav

Thivim Railway Accident: थिवी येथे रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. शनिवारी (11 ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून कोकण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली.

थिवी रेल्वे स्टेशनच्या जवळच्या रेल्वे रुळांवर हा अपघात झाला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र ही व्यक्ती स्थानिक होती की बाहेरची, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. रेल्वे रुळ ओलांडत असताना किंवा रुळाजवळून जात असताना त्याला वेगात येणाऱ्या रेल्वेची धडक बसली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची (Accident) तीव्रता जास्त असल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

पोलिसांची कारवाई आणि तपास

घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि पुढील तपास सुरु केला. कोकण रेल्वे पोलिसांनी या अपघाताची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून केली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटेपर्यंत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मृतदेह गोमेकॉच्या (Goa Medical College) शवागारात ठेवण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक पी. जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस आता मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. त्यासाठी आसपासच्या परिसरातील लोकांकडून चौकशी केली जात आहे, तसेच, हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारींची तपासणीही केली जात आहे. अपघात नेमका कसा झाला, हा अपघात होता की व्यक्तीने आत्महत्या केली याचा तपास पोलीस (Police) करत आहेत. थिवी रेल्वे स्टेशनजवळ घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे रेल्वे प्रवासादरम्यान अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT