Ponda : वारखंडे - फोंडा येथील चौपदरी रस्त्याच्या उड्डाण पुलाखाली ठेवलेल्या एका ट्रकच्या केबिनमध्ये शुक्रवारी रात्री एक मृतदेह सापडला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नव्हती. मात्र आता हा मृतदेह एका बिगर गोमंतकीय मजुराचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांत कोणतेही ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख पटू शकली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार, हा मृतदेह एका बिगर गोमंतकीय मजुराचा असून तो गोव्यात मजूर म्हणून काम करीत होता. फोंडा पोलिसांनी मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या शवागारात ठेवला असून पुढील चौकशी सुरू आहे.
वारखंडे-फोंडा येथील पार्क केलेल्या एका ट्रकमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी रात्री सापडला होता. तीव्र वास येत असल्याने येथील काही लोकांनी शोधाशोध केली तेव्हा ट्रकच्या केबिनमधे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. याबाबत फोंडा पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी लगेच धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. मात्र मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. हा मृतदेह एखाद्या भिकाऱ्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता, मात्र आता तो एका मजुराचा असल्याचं तपासात पुढे आलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.