Leopard Death Dainik Gomantak
गोवा

Leopard Death: शिरवई-केपे येथे बिबट्याचा फासात अडकून दुर्दैवी अंत

जंगलांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून रानटी जनावरे सुरक्षित अधिवास शोधत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard Death एका बाजूने राज्यात वेगवेगळ्या भागांत जंगलांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून रानटी जनावरे सुरक्षित अधिवास शोधत आहेत. मात्र, ही जनावरे काही लोकांनी शिकारीसाठी लावलेल्या फासात अडकून मरण पावण्याच्या घटना घडत आहेत.

पाडादेग-शिरवई (केपे) येथे एक बिबट्या फासात अडकून गंभीर जखमी झाल्याने मरण पावल्याचे वन खात्यातर्फे सांगण्यात आले.

आज सकाळी 8.30 वाजता एक युवक पाडादेग येथे कुळागारात बंद असलेल्या लॉजमध्ये मित्रांसह विश्रांती घेण्यासाठी गेला असता, त्याला लॉजमधील एका कोपऱ्यात बिबटा असल्याचे दिसून आले.

त्याने या कुळागाराची राखण करणाऱ्या व्यक्तीला बोलावून आणले व तेथे बिबट्या असल्याचे सांगितले. जवळ जाऊन पाहणी केली असता, बिबट्या हालचाल करीत नसल्याचे दिसून आले. याची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली असता, त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT