Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Unemployment: गोव्यातल्या घरफोडीच्या घटनांचा बेरोजगारीशी संबंध? काँग्रेस नेत्याने मांडले तर्क

Unemployment Rate Goa: बेरोजगार तरुणांच्या सहभागासह वाढत्या गुन्हेगारी कारवाया हे सिद्ध करतात की रोजगाराच्या मुद्द्याकडे लक्ष देण्यात सरकार अपयशी ठरले आहे; युरी आलेमाव

Pramod Yadav

Goa Unemployment And Crime

पणजी : राज्यातील घरफोडीच्या अनेक घटनांमध्ये बेरोजगार तरुणांच्या सहभाग असल्याने त्यांना चांगल्या दिशेने नेण्यासाठी व अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारने रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी केली.

'रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्याने हजारो सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यातील बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.'

'तरीही सरकार हा प्रश्न सोडवण्याची तसदी घेत नाही, उलट नीती आयोग आणि सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे अहवाल निराधार असल्याचा आरोप करत आहे. अपयशाच्या अहवालावर राज्य सरकारचा केंद्रातील इंजिनवरही विश्वास नाही,' असे आलेमाव म्हणाले.

बेरोजगार तरुणांच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब असून, रोजगार निर्मिती करण्यास आणि गुन्हे नियंत्रणात ठेवण्यास सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.

आलेमाव म्हणाले की, आपले बेरोजगार तरुण उपजीविकेसाठी घरफोडीचा मार्ग अवलंबत आहेत, ही धक्कादायक बाब आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांत घरफोडीच्या शंभराहून अधिक घटना घडल्या असून त्यात बेरोजगार तरुणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

'काही अंमली पदार्थांच्या घटनांमधून सु्द्धा ही बाब स्पष्ट होते की, यात स्थानिक तरुणांचाही सहभाग आहे. ते हा अवैध धंदा का निवडतात याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे नोकरीचा पर्याय नसतो. सरकार कार्यक्रम आणि कमिशनमध्ये व्यस्त आहे, परंतु बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यात अपयशी ठरले आहे, अशी खंत आलेमाव यांनी व्यक्त केली.

'बेरोजगार तरुणांच्या सहभागासह वाढत्या गुन्हेगारी कारवाया हे सिद्ध करतात की रोजगाराच्या मुद्द्याकडे लक्ष देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि युवकांना चांगल्या दिशेने नेण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी गती मिळायला हवी,' असे आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT