Goa Panchayat Elections  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat : सावर्डे पंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

सावर्डे पंचायतीवर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता आली असून आमदार गणेश गावकर यांचे समर्थन असलेले मंडळ पुन्हा एकदा या पंचायतीवर निवडून आले आहे.

दैनिक गोमन्तक

केपे : सावर्डे पंचायतीवर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता आली असून आमदार गणेश गावकर यांचे समर्थन असलेले मंडळ पुन्हा एकदा या पंचायतीवर निवडून आले आहे. गेल्या पाच वर्षात माजी आमदार दीपक पाऊसकर यांचे बंधू संदीप पाऊसकर यांनी पाच वर्षे सरपंचपद उपभोगले होते.

मात्र आता या पंचायतीवर जुने पाच भाजप कार्यकर्ते जिंकून आल्याने संदीप पाऊसकर समर्थक पंच सदस्यांना विरोधात बसावे लागणार आहे. सावर्डे पंचायतीच्या काही प्रभागात भाजपाचेच कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सर्वांच्या नजरा या पंचायतीच्या निकालावर लागून राहिल्या होत्या.

टोनी नगरच्या प्रभाग 3 मध्ये भाजप विरुध्द भाजप अशी स्थिती होती. खासदार विनय तेंडुलकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्वीय सचिव संकेत आर्सेकर यांनी भाजपचेच दीपक सावंत यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा केला होता; पण दोघांचीही जादू चालू शकली नाही. त्या व्यतिरिक्त पाऊसकर यांच्या पॅनलमधील उमेदवरांना पराभूत करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले.

प्रभाग एक मधून भाजपाच्या चिन्मय नाईक, प्रभाग दोन मधुन उन्नती वडार, प्रभाग तीन मधून दिपक सावंत, प्रभाग सात मधून नितेश भंडारी, प्रभाग आठ मधून शशिकांत नाईक आणि प्रभाग नऊ मधुन संजय नाईक हे भाजपाच्या समर्थनावर निवडून आले आहेत.

पाऊसकर यांच्या पॅनलमधील प्रभाग सहा मधून सिद्धी प्रभू पाऊसकर, प्रभाग पाच मधून गोकूळदास नाईक, आणि प्रभाग चार मधून निलेश तारी निवडुन आले आहेत. संदीप पाऊसकर यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळे त्यांची पत्नी सिद्धी पाऊसकर त्यांच्या ऐवजी रिंगणात उतरल्या होत्या.

विद्या सावर्डेकर आणि कोमल कुडाळकर यांचा पराभव करून सिद्धी यांनी पाऊसकर यांचा गढ पुन्हा शाबूत ठेवला आहे. पाऊसकर यांचा पॅनलचे तीन उमेदवार निवडून आल्यामुळे सावर्डे पंचायतीवर भाजपाचा सरपंच विराजमान होणार आहे हे निश्चित झाले आहे. माजी सरपंच संजय नाईक यांनी पत्रकारांशी बोलतांना स्थानिक आमदार गणेश गावकर यांची भेट घेऊनच पुढील रणनीती ठरवली जाणाऱ असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: म्हापशात भाजपचा 'इन-हाऊस' सामना!

Viral Post: "जगातील सर्वोत्तम T20 फलंदाज बाहेर कसा?" टीम इंडियाच्या संघ निवडीवर दिग्गज खेळाडू भडकला! पोस्ट होतेय व्हायरल

इतरांशी तुलना नव्हे, स्वतःची ताकद ओळखा; आनंदी जीवनाचा खरा मार्ग

Child Rights Commission: राज्य बालहक्क आयोगावर सरकारची नजर; देखरेख समिती नियुक्त, चौकशी अहवालावर कारवाईची तयारी

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगात 2.10 फिटमेंट फॅक्टरची चर्चा; सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित...

SCROLL FOR NEXT