Chapora River Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Chapora: बेकायदा रेती उपसाकडे पोलिसांची डोळेझाक का? 'शापोरा'त स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये उलगडला धक्कादायक प्रकार

Chapora River: आगरवाडा-चोपडे नागरिक समितीच्या स्ट्रिंग ऑपरेशनमुळे चोपडे येथे शापोरा नदीत चाललेला बेकायदा रेती उपसा उघड झाला असून पोलिसांचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Chapora River Illegal Sand Mining

मोरजी: आगरवाडा-चोपडे नागरिक समितीच्या स्ट्रिंग ऑपरेशनमुळे चोपडे येथे शापोरा नदीत चाललेला बेकायदा रेती उपसा उघड झाला असून पोलिसांचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

आगरवाडा-चोपडे ग्रामपंचायतीत तक्रार दाखल झाल्यानंतर पंचायतीने याबाबत शापोरा नदीत गस्त घालण्यासाठी नियुक्त केलेल्या शिवोली किनारी व्यवस्थापन पोलिसांशी संपर्क साधून त्यांना याबाबत पुढील कारवाई करण्याची मागणी केली होती. या निवेदनाला प्रतिसाद देताना शापोरा नदीत कुठल्याही प्रकारचा अवैध रेती उपसा व्यवसाय होत नसल्याचे आगरवाडा-चोपडे पंचायतीला कळविले होते.

आगरवाडा चोपडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत हा विषय पुन्हा चर्चेत आला होता, या बेकायदा रेती उपशावर कडक कारवाई करण्यात मात्र शापोरा नदीत रात्रीचा खेळ चालूच असल्याचे आढळून आल्याने याबाबत कारवाईसाठी आगरवाडा-चोपडे नागरिक समितीने शिवोली किनारी पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांशी संपर्क साधल्यानंतर त्या रेती माफियांना पकडण्याऐवजी त्यांना याबाबत सूचना देऊन घटना स्थळावरून पलायन करण्याची संधी दिली जाते.

त्यामुळे शापोरा नदीत चाललेल्या या रात्रीच्या खेळाविरुद्ध आगरवाडा नागरिक समितीने यापुढे आपले स्ट्रिग ऑपेरेशन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आगरवाडा-चोपडे नागरिक समितीला शापोरा नदीत रेती उपसा चालू असल्याचे आढळून आले. या रेती माफियाना पकडण्याची योजना आखली. त्यानुसार ३ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास नागरिक समितीचे सदस्य एकत्रित आले आणि त्यांनी शापोरा नदीत अंधारात रेती उपसा करणाऱ्या ३ होड्यावर नजर ठेवली. नेहमीप्रमाणे या होड्या किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना रंगे हात पकडण्याचे ठरवले. त्यानुसार सर्वजण होड्यावर नजर ठेवून होते. त्यावेळी शिवोली किनारी व्यवस्थापन पोलिस आपली मशीन असलेली होडी घेऊन त्या बाजूने येत असल्याचे आढळून आले. किनारी पोलिस रेती उपसा करणाऱ्या होड्या ताब्यात घेतील असे वाटले, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केले नाही. याबाबत स्थानिकांत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कारवाईची गरज!

शापोरा नदीत चाललेल्या बेकायदा रेती उपशावर नियंत्रण येणे आवश्‍यक आहे. संबंधित खात्याने त्वरित कारवाई करावी, अशी चोपडे-आगरवाड्यातील ग्रामस्थांची मागणी आहे. लक्ष ठेवणारेच जर का बेकायदा कृतीकडे दुर्लक्ष करीत असतील तर पर्यावरणीय हानी मोठ्या प्रमाणात होईल आणि नदी पात्रातील जैविक संपत्तीचेही नुकसान होईल, असेही स्थानिकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT