Goa Miles E Rickshaw Dainik Gomantak
गोवा

E- Rickshaw: ई-रिक्षांमुळे दिव्यांगांना मिळेल राज्यात प्रवाससुलभता; मंत्री सुभाष फळदेसाई

Subhash Phaldesai: आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब ई-रिक्षा वितरण उपक्रमातून उमटत असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: प्रत्येक व्यक्ती तिच्या शारिरीक क्षमतेच्या पलीकडे जात स्वतंत्रपणे, मुक्तपणे आणि सन्मानाने समाजात वावरू शकेल, असा गोवा निर्माण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. सर्वसमावेशक वातावरण निर्मिती करणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबतच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब ई-रिक्षा वितरण उपक्रमातून उमटत असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिले.

गोवा माईल्सच्या व्यवस्थापनाखाली दिव्यांगाना ही सुविधा सुरू होत आहे. मुख्यमंत्री देव दर्शन योजना चतुर्थीनंतर सुरू होणार आहे, त्याचबरोबर दयानंद सामाजिक योजनेचे दोन महिन्यांची थकित रक्कम ३ तारखेपर्यंत लाभार्थींच्या खात्यावर जमा होतील, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.

दिव्यांगांना रिक्षा वाटप कार्यक्रमानंतर फळदेसाई पत्रकारांशी बोलत होते. मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव ई. वल्लवन (आयएएस), राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालक वर्षा नाईक, राज्य समाजकल्याण संचालनालयाचे संचालक अजित पंचवाडकर आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक यांची उपस्थिती होती.

योजनांची माहिती देणार!

समाजकल्याण खात्याच्या विविध योजना समाजातील विविध घटकांसाठी आहेत; परंतु त्या जनतेपर्यंत पोहोचत नसल्याची खंत सरकारला आहे. यासाठी गणेश चतुर्थीनंतर प्रत्येक तालुक्यात भेट देऊन खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार असल्याची माहिती मंत्री फळदेसाई यांनी ई-रिक्षा वाटपाच्या कार्यक्रमापूर्वी पत्रकार परिषदेत दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT