गोव्याच्या किनारी भागात ‘स्‍वच्छतेचे तीनतेरा! Dainik Gomantak
गोवा

मोरजी किनारी भागात ‘स्‍वच्छतेचे तीनतेरा!

पर्यटनखाते स्वच्छता करण्यास अपयशी : ग्रामस्‍थांकडून श्रमदान

दैनिक गोमन्तक

मोरजी: खाण व्यवसायात (Goa Mining) मंदी आल्याने सरकारला मोठ्या प्रमाणात पर्यटन (Tourism) व्यवसायाकडून महसूल मिळत आहे. मात्र, त्या महसुलाच्या बदल्यात आजपर्यंत किनारी भागात जीवरक्षक सुविधांपलीकडे सरकारने काहीच योजना व सुविधा पुरवल्या नाहीत. स्वच्छता मोहिमेचे तर ‘तीन तेरा वाजले’ आहेत. मोरजी किनारी भागात कासव संवर्धनासाठी आरक्षित जागा ते होड्या ठेवणाऱ्या ठिकाणांपर्यंत पर्यटन खात्याचे कंत्राटदार कचरा उचल करीत नाही. त्यामुळे हा परिसर विद्रूप दिसत आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी विदेशी पर्यटकांनी कचरा गोळा केला होता. आता येथील स्थानिक युवक आल्बर्ट फर्नांडिस यांनी पदरमोड करून चार कामगारांकडून परिसरातील कचरा गोळा करून पर्यटन खात्याचे लक्ष वेधले आहे.

कचरा व्‍हायरल आणि बदनामी
किनारी भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो. नागरिक देशी विदेशी पर्यटक मग या कचऱ्याचे चित्रीकरण छायाचित्रे घेऊन सामाजिक माध्यमातून व्हायरल करून किनारे बदनाम करण्यास कारणे पुढे जोडली जातात. किनाऱ्यावर कचरा साचल्याने पर्यटक या भागात फिरकत नाही. कासव संवर्धन मोहिमेच्या जागा आणि ज्या ठिकाणी पारंपरिक होड्या आहेत, तिथपर्यंत कचऱ्याच्या राशी दिसून येत होत्या. विदेशी पर्यटकांच्‍या पायाला काटे, काचा लागतात, अशा तक्रारी आहेत. काही नागरिक तर समुद्रात आपल्या घरातील नको असलेला कचरा फेकतात. तो कचरा मग किनाऱ्यावर वाहून येतो. पर्यटक खात्याचे मंत्री बाबू आजगावकर यांचे या किनाऱ्यावर लक्ष नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
-आल्‍बर्ट फर्नांडिस, मोरजी ग्रामस्‍थ

‘दृष्‍टी’पल्‍याड कचरा!
किनारी भागातील कचरा उचलण्याचे कंत्राट दृष्‍टी कंपनीला दिले आहे. त्यांचे कामगार कुठला कचरा गोळा करतात, ते त्यांना माहीत असणार. सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार करावा. किनारी भागातील कचरा व्यवस्थित कंत्राटदार उचलत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT