Goa Cricket Association Annual Meeting Canva
गोवा

Goa Cricket: 'जीसीए' आमसभेचा खेळखंडोबा कधी संपणार? अनेक महत्त्वाचे निर्णय मंजुरीविना

Goa Cricket Association: गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) तहकूब झालेली वार्षिक आमसभा सध्यातरी अधांतरी असून राज्य क्रिकेटचे भवितव्य ठरवणारी महत्त्वाची बैठक नक्की कधी होईल याबाबत संभ्रम आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cricket Association Annual Meeting Date Uncertain

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) तहकूब झालेली वार्षिक आमसभा सध्यातरी अधांतरी असून राज्य क्रिकेटचे भवितव्य ठरवणारी महत्त्वाची बैठक नक्की कधी होईल याबाबत संभ्रम आहे.

जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनी तयार केलेले इतिवृत्त, की सचिव रोहन गावस देसाई यांनी आमसभेनिमित्त क्लबांना पाठविलेले इतिवृत्त मंजूर करण्यावरून रविवारी आमसभेत प्रचंड गोंधळ माजला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि गोंधळाच्या वातावरणात अखेर आमसभा तहकूब करण्यात आली. अगोदर ही आमसभा ऑक्टोबर महिन्याच्या पाच तारखेला होणार होती, परंतु तांत्रिक कारणास्तव बैठकी लांबणीवर पडली.

आता २० ऑक्टोबरलाही आमसभेचे कामकाज न झाल्यामुळे बहुतांश महत्त्वाचे निर्णय मंजुरीविना आहेत. यापूर्वी जीसीएची आमसभा सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात होत असे, मात्र यंदा ती नोव्हेंबरमध्ये होणार का बाबत स्पष्टता नाही. सध्या अध्यक्ष व सचिव यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने असल्याचे रविवारच्या आमसभेत सिद्ध झाले. प्राप्त माहितीनुसार, संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा सचिव रोहन यांना पाठिंबा आहे.

जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनी सोमवारी सांगितले, की ‘‘माझ्या माहितीप्रमाणे जीसीए आमसभा अध्यक्ष संचलित करतो. त्यामुळे मागील सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्याचा हक्क अध्यक्ष या नात्याने मला आहे. मागील बैठकीत जे घडले तेच माझ्या इतिवृत्तात नोंदीत आहे. माझ्यानुसार, सचिवांना इतिवृत्त सादर करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आमसभेत मंजुरीसाठी कोणाचे इतिवृत्त ग्राह्य आहे याबद्दलल मी घटनात्मक सल्ल्यासाठी जीसीए लोकपालाकडे दाद मागणार आहे. लोकपालाच्या निर्णयानंतरच आमसभेबाबत स्पष्टता येईल.’’

सचिव रोहन यांनी क्लबांना पाठविलेल्या इतिवृत्तात मागील आसमभेतील वस्तुस्थिती नाही. त्यात बरेच बदल करण्यात आल्याचा दावा विपुल यांनी केला. लोकपाल जो निर्णय घेतील त्याच्याशी आपण बांधील असेन, तसेच याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा आपला विचार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमसभेने मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देणे आवश्यक आहे, तसेच अंदाजपत्रकही आमसभेने मंजूर करणे क्रमप्राप्त आहे. साधारणतः ही प्रक्रिया सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत होणे अपेक्षित होते, परंतु चालढकल झाली, ते योग्य नाही, असेही विपुल यांनी स्पष्ट केले.

दिवाळीनंतर आमसभेचा निर्णय?

जीसीए व्यवस्थापकीय समितीच्या एका महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्याने दिलेल्या संकेतानुसार, रविवारी तहकूब करण्यात आलेली आमसभा लगेच होण्याची शक्यता खूपच कमी आहे. ‘‘इतिवृत्त कोणी सादर करावे हे महत्त्वाचे आहे. त्याबाबत पुढील प्रक्रिया होईल. सध्या तरी लगेच आमसभा होण्याचे गृहित धरता येणार नाही. लवकरच दिवाळी आहे. त्यामुळे त्यानंतरच पुन्हा आमसभा बोलावण्याचे ठरेल,’’ असे हा प्रमुख पदाधिकारी म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT