Margao Crime: रात्री बार बंद झाल्यानंतर दारु न दिल्याने खून; आरोपीला चार वर्षानंतर जन्मठेप

Margao Crime News: दारु न दिल्याच्या रागातून दोघांच्‍या डोक्‍यात दगड घालन त्‍यांचा खून केल्याचा आरोप असलेल्‍या अर्जुन मारुती काजीदाेनी (३०) याला जन्‍मठेपेची शिक्षा.
Margao Crime: रात्री बार बंद झाल्यानंतर दारु न दिल्याने खून; आरोपीला चार वर्षानंतर जन्मठेप
Imprisonment Canva
Published on
Updated on

Murder suspect get Lifer in Margao Case

मडगाव: रात्रीच्‍यावेळी बार बंद झाल्‍यावर आपल्‍याला दारु आणून द्या, असा हट्ट धरुन ती दारु न दिल्याच्या रागातून दोघांच्‍या डोक्‍यात दगड घालून त्‍यांचा खून केल्याचा आरोप असलेल्‍या अर्जुन मारुती काजीदाेनी (३०) याला मडगावच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांनी दोषी ठरवून जन्‍मठेपेची शिक्षा ठोठावली. ही घटना मडगावच्‍या ‘एसजीपीडीए’ मार्केटजवळ ३ फेब्रुवारी २०२० या दिवशी घडली होती.

न्‍या. जोशी यांनी संशयिताला जन्‍मठेपेच्या शिक्षेशिवाय दहा हजार रुपये दंड फर्मावला आहे. त्‍याशिवाय अन्‍य एकाला मारहाण करुन दुखापत केल्‍याच्‍या आराेपाखाली सहा महिन्‍यांच्‍या कैदेची शिक्षा फर्मावली आहे.

मात्र संशयित त्‍याहीपेक्षा अधिक काळ तुरुंगात असल्‍याने त्‍याची दुखापत करण्‍याच्‍या गुन्‍ह्याखालील शिक्षा या शिक्षेत गृहित धरली आहे. आरोपीने दहा हजार रुपये दंडाची रक्‍कम न भरल्‍यास त्‍याला आणखी सहा महिन्‍यांची अतिरिक्‍त शिक्षा देण्‍यात आली आहे. या संशयिताला ५ आॅक्‍टोबर रोजी खुनाच्‍या आरोपाखाली दोषी ठरविले हाेते. फातोर्ड्याचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी ही खुनाची घटना घडल्‍यानंतर संशयिताला अवघ्‍या १२ तासांत अटक केली होती.

ही घटना ३ फेब्रुवारी २०२० रोजी झाली होती. मडगाव मार्केटात हमाल म्‍हणून काम करणाऱ्या भीमसी गस्‍ती (३०) आणि मुतन्ना उर्फ रवी बडीगार (१८) या दोघांच्‍या डाेक्‍यावर दगड घालून त्‍यांचा खून केला होता. तर सुनील सावंत याला मारहाण केली होती. या प्रकरणात सरकारी वकील म्‍हणून गोविंद गावकर यांनी पोलिसांची बाजू सक्षमपणे मांडून संशयितावरील गुन्‍हा सिद्ध करून दाखविला.

Margao Crime: रात्री बार बंद झाल्यानंतर दारु न दिल्याने खून; आरोपीला चार वर्षानंतर जन्मठेप
CM Pramod Sawant: 'ती'चे पितळ मीच उघडे पाडले होते! 'नोकरी घोटाळा' प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

अशी घडली होती खुनाची घटना

‘एसजीपीडीए’ मार्केटमध्ये असलेल्‍या एका बारजवळ गस्‍ती आणि बडीगार हे बसलेले असताना तिथे संशयित काजीदोनी आला. त्‍या तिघांनीही तिथे दारु घेतली त्‍यानंतर बारमालक बार बंद करून निघून गेला. ते थंडीचे दिवस असल्‍याने ते तिघेही तिथे शेकाेटी पेटवून बसले होते. तिथे बसलेले असतानाच संशयिताला झोप लागली. बऱ्याचवेळाने तो झोपेतून उठल्‍यावर आपल्‍याला आणखी दारु हवी, असा हट्ट त्‍याने धरला.

गस्‍ती आणि बडीगार यांनी दारु आणून द्यावी, नाहीतर आपल्‍याला पैसे द्यावेत, अशी मागणी त्‍याने केली. मात्र आपली मागणी पूर्ण न झाल्‍याने रागाच्‍या भरात त्‍याने सुरुवातीला शेकोटीजवळच पडलेल्या फुटलेल्‍या दारुच्‍या बाटलीने त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला आणि नंतर त्‍यांच्‍या डाेक्‍यात दगड घालून त्‍यांची हत्‍या केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Congress Leader Shot Dead
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com