Goa Assembly
Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

तिढा कायम, गोव्यात अजूनही मंत्रिमंडळ अनिश्चित

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजप सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाली असली तरी अद्यापही मंत्रिमंडळ ठरलेले नाही. यासंदर्भातील संभाव्य यादी समाज माध्यमांवर फिरत असली तरी मंत्रिपदाचे सर्वाधिकार हे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असून गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची अंतिम यादी 27 मार्च रोजी तयार होईल आणि त्यानुसार 28 मार्चला आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत विरोधात लढलेल्या मगोपचा (MGP) पाठिंबा घेण्याविरोधात भाजपचे काही स्थानिक नेते आणि आमदार असून याबाबतचा निर्णयही अद्याप झालेला नाही. मात्र, रविवारी भाजपने सत्तेचा दावा केला, त्यावेळी मगोपने बिनशर्त पाठिंबा दिल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) 20 जागा मिळवत काठावरचे बहुमत गाठले. तसेच तीन अपक्ष आणि दोन मगोप आमदारांनी पाठिंबा दिल्याने सध्या भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. आता 28 मार्चला शपथविधी सोहळा ठरला असला तरी अद्यापही मंत्रिपदाबाबत अनिश्चितता कायम आहे. संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समाज माध्यमांवर आणि प्रसिद्धी माध्यमातून फिरत असली तरी यात बदलाची मोठी शक्यता आहे. याबाबतचे सर्व अधिकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याकडे घेतले असून गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस त्यांचे दूत म्हणून सध्या कार्यरत आहेत. ते गोव्यातील इत्थंभूत राजकीय माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ रचनेतही फडणवीस महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

भाजपच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचे वेळापत्रक व्यस्त झाले आहे. आज त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. 25 मार्च रोजी ते उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला उपस्थित राहाणार आहेत.

भाजपचे 20, अपक्ष 3 आणि 2 मगोपसह 25 आमदार भाजपकडे आहेत. मात्र, मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह केवळ 12 मंत्री बनू शकतात. त्यामुळे इतर आमदारांना महामंडळे द्यावी लागणार आहेत. त्यामध्ये आर्थिक विकास, पर्यटन विकास, औद्योगिक विकास, साधनसुविधा, शिक्षण, फलोत्पादन, कदंब या महामंडळांवर आमदारांची वर्णी लागू शकते.

मंत्रिमंडळाचा शपथविधी 28 मार्च रोजी होणार असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर जोरदार तयारी सुरू आहे. स्टेडियमवर या शपथविधी सोहळ्याला देशभरातून महनीय व्यक्ती येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी या स्टेडियमच्या शेजारील फुटबॉल ग्राउंडवर हेलिपॅड बांधण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT