...त्यामुळेचं गोव्यात काँग्रेसचा पराभव झाला

गोव्यात लवकरच होणार कॉंग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा
Rajni Patil on Goa Congress Defeat, Rajni Patil says BJP split the Congress votes in Goa and thus the Congress was defeated
Rajni Patil on Goa Congress Defeat, Rajni Patil says BJP split the Congress votes in Goa and thus the Congress was defeatedDainik Gomantak

रिव्हॉल्युशनरी गोवन्स, आप, तृणमूल काँग्रेसने काँग्रेसची मते फोडली. त्यामुळेच गोव्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे. असे असले तरी काँग्रेसकडून भाजपविरोधीचा हा लढा कायम राहील आणि विरोधी पक्षनेता, नव्या प्रदेशाध्यक्षाची लवकरच घोषणा केली जाईल अशी माहिती काँग्रेस निरीक्षक रजनी पाटील यांनी दिली आहे. काँग्रेसने (Congress) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 37 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांच्या मित्रपक्ष गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पार्टीला 3 जागा दिल्या होत्या. यावेळी म्हणजे 2022 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि मित्र पक्षाला केवळ 11 जागा जिंकता आल्या आहेत. (Rajni Patil on Goa Congress Defeat)

Rajni Patil on Goa Congress Defeat, Rajni Patil says BJP split the Congress votes in Goa and thus the Congress was defeated
उटा आंदोलन मृत्यू प्रकरणाची सुनावणी तब्बल 11 वर्षानंतर पूर्ण

एका व्यक्तीवर किवा एका पक्षावर भाष्य करणार नाही परंतु निश्चितपणे काहींनी आमची मते विभागली आणि आम्हाला याचा अंदाज आला नव्हता. भाजपची (BJP) मते अबाधित असताना त्यांनी आमच्या धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी केली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पराभूत झालेल्या राज्यांमधील परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी नियुक्त केलेल्या नेत्यांपैकी एक असलेल्या पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, येथे नेमके काय घडले. ग्राउंड लेव्हलचा अभ्यास केला जात असून त्याचा अहवाल पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाला सादर करण्यात येणार आहे. राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले मत त्या नेतृत्वापर्यंत पोहोचवणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com