Umesh Harijan murder case  Dainik Gomantak
गोवा

Umesh Harijan Murder: संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी

संशयितांपैकी दोघांना फोंडा पोलिसांनी पाठलाग करून पकडले ; तीन आरोपींचा शोध सूरुच

दैनिक गोमन्तक

वास्को: उमेश हरिजन (33) यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले दोन आरोपी अमीर हुसेन आणि दीपक सहानी यांना मंगळवारी वास्को पोलिसांनी वास्को न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

(Umesh Harijan murder case Amir Hussain and Deepak Sahani remanded 7 day police custody)

तीन आरोपींचा शोध सूरुच

वास्को पोलीस आणखी तीन आरोपींचा शोध घेत असून आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. पोस्टमॉर्टम तपासणी अहवालानुसार मृताचा मृत्यू गंभीर वार आणि फुफ्फुसाला झालेल्या जखमांमुळे झाला, असा खुलासा वास्को उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार यांनी केला.

काटेबायणा येथे सोमवारी भर दुपारी चौघांनी कोयता व चाकूने सपासप वार करून उमेश हरिजन (30, रा. हाऊसिंग कॉलनी, बायणा) या तरुणाची निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. चार संशयितांपैकी दोघांना फोंडा पोलिसांनी पाठलाग करून पकडले आणि मुरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. दीपक सहानी आणि अमिर अशी या संशयितांची नावे आहेत.

नेमके काय घडले ?

उमेश हा सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बायणातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात आला होता. तेथे श्रींचे दर्शन घेऊन महापूजेचा महाप्रसाद घेऊन निघाला होता. त्याच्यासोबत मित्र अशोक चलवादी होता. ते काटेबायणा येथील उड्डाणपुलाजवळ पोहोचले असता तेथे दबा धरून बसलेल्या चौघांनी त्यांना अडविले व उमेशला उड्डाण पुलाखाली नेले. तेथे त्याच्यावर कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात उमेश गंभीर जखमी झाला. हा प्रकार घडत असताना अशोकने उमेशच्या भावाला माहिती दिली. भाऊ विजय तेथे कार घेऊन येईपर्यंत हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. उमेशला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

उमेश याने दीड वर्षापूर्वी चार संशयितांपैकी एकाच्या भावाला मारहाण केली होती. तो राग मनात ठेवून त्या चौघांनी सोमवारी दुपारी डाव साधला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान आज मंगळवारी वास्को पोलिसांनी न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग वास्कोसमोर हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान वास्को पोलिसांनी बायणा आणि मांगोरहील परिसरात आज गस्त कायम ठेवली आणि काल बायणा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हिस्ट्री शीटर्स आणि रोडरोमीयोंना तपासले. सर्वांना ताकीद देण्यात आली असून वास्को पोलीस अशा गुन्ह्यांविरोधात कडक कारवाई करतील आणि गुन्हा करणाऱ्यांना कोणतीही दया माया पोलीस दाखवणार नसल्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT