Uma Patil, Cash For Job Goa Dainik Gomantak
गोवा

Uma Patil Case: पैसे मागितल्यास 'उमा' द्यायची धमकी! दहा वर्षांत जमवली लाखोंची माया; वास्कोप्रकरणी 'दीक्षा'विरुद्धही नोटीस जारी

Cash For Job: उमाने फक्त सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली असे नाही, तर काहीजणांना स्वस्तात फ्लॅट, प्लॉट देण्याचे आमिष तिने दाखविले आणि त्यांच्याकडून पैसे घेतले होते. दीक्षाविरुद्धही नोटीस जारी.

गोमन्तक डिजिटल टीम

Uma Patil Cash For Job

वास्को: वास्को येथे सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून उमा पाटील हिने गेल्या आठ-दहा वर्षांपासून काहीजणांची फसवणूक करून बरीच माया जमविली होती. उमाने फक्त सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली असे नाही, तर काहीजणांना स्वस्तात फ्लॅट, प्लॉट देण्याचे आमिष तिने दाखविले आणि त्यांच्याकडून पैसे घेतले होते.

उमा आणि तिचा मुलगा शिवम यांच्याविरोधात चिंचवाडा-चिंबल, रायबंदर येथील रश्मी चोपडेकर यांनी बुधवारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बायणातील केंचव्वा मदार यांनी गुरुवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पैसे मागितल्यास धमकी

नोकरी, फ्लॅट-प्लॉटसाठी दिलेले पैसे मागण्यासाठी तिच्या घरी येणाऱ्यांना ती निरनिराळ्या पद्धतीने धमकावत असे. त्यामुळे त्या लोकांनी पोलिसांत तक्रारी करण्याऐवजी गप्प राहाणेच पसंत केले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या आवाहनानंतर पीडित लोक पुढे येऊ लागले आहेत.

दीक्षाविरुद्ध नोटीस जारी

वास्को येथील सरकारी शाळेत शिपायाची नोकरी देण्याच्या बहाण्याने बायणा येथील एका महिलेची ३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी दीक्षा तळवणेकर हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. पोलिस दीक्षाच्या घरी गेले असता ती तेथे नव्हती. तिला पोलिस स्थानकात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT