Electric Bus  Dainik Gomantak
गोवा

Electric Bus : कदंबकडे 200 इलेक्ट्रिक बसगाड्यांचा तुटवडा : उल्हास तुयेकर

Electric Bus : आणखी दोन इलेक्ट्रिक बसगाड्या ताफ्यात दाखल, पणजीत धावणार

गोमन्तक डिजिटल टीम

Electric Bus : पणजी, कदंब महामंडळाला सध्या २०० इलेक्ट्रिक बसगाड्यांचा तुटवडा भासत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कदंबला ४८ पैकी ३२ इलेक्ट्रिक बसगाड्या मिळाल्या आहेत, असे कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

कदंब परिवहन महामंडळाच्या ताफ्यात मंगळवारी दोन इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या बसगाड्या मिळाल्या असून या दोन्ही बसगाड्या पणजी बसस्थानक ते गोवा विद्यापीठ मार्गे बांबोळी रुग्णालय अशी सेवा देणार आहेत.

तुयेकर यांच्या हस्ते या दोन इलेक्ट्रिक बसगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

उल्हास तुयेकर यांनी यावेळी सांगितले की, १५ डिसेंबरपर्यंत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजीत आणखी काही इलेक्ट्रिक बसगाड्या धावणार आहेत. कदंब महामंडळाकडे २०० इलेक्ट्रिक बसगाड्यांची कमतरता आहे.

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ४८ इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार असून आतापर्यंत फक्त ३२ इलेक्ट्रिक बसगाड्या मिळाल्या आहेत. मद्यपी चालकांबाबत तुयेकर म्हणाले की, कदंबचे टीसी अधिकारी संशयित वाहनचालकांची अल्कोमीटर चाचणी करतील. मद्यधुंद अवस्थेत आढळल्यास त्याचे समुपदेशन केले जाईल. यावेळी उपाध्यक्ष क्रितेश नाईक गावकर, महाव्यवस्थापक संजय घाटे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

चार्जिंग स्टेशन उभारणार

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे पणजी शहरात इलेक्ट्रिक बसगाड्या सुरू करण्यास उशीर झाल्याचे तुयेकर यांनी सांगितले.

या बसगाड्यांची वेळ आणि मार्ग लवकरच ठरवले जातील. चार्जिंग स्टेशनचे कामही लवकरच सुरू होणार आहे. मडगाव, पर्वरी आणि इतर ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT