Benaulim Beach Dainik Gomantak
गोवा

कुत्रे मागे लागल्‍याने बैल उधळला, बाणावलीत फिरायला आलेली ब्रिटीश महिला बैलाने शिंग खुपसल्‍याने जखमी

मॉरिस या आपल्‍या अन्‍य साथीदारांबरोबर बाणावली समुद्र किनार्‍यावर आल्‍या होत्‍या.

सुशांत कुंकळयेकर

Benaulim Beach: बाणावली समुद्र किनार्‍यावर फिरायला आलेल्‍या युवाॅन मॉरिस या 79 वर्षीय ब्रिटीश महिलेला एका उधळलेल्‍या बैलाने शिंग खूपसल्‍याने ती जखमी होण्‍याची घटना घडली. त्‍यानंतर तिला तातडीने दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात हलविण्‍यात आले. तिथे तिच्‍यावर उपचार करण्‍यात आले.

घटना सकाळी 11 वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. मॉरिस या आपल्‍या अन्‍य साथीदारांबरोबर बाणावली समुद्र किनार्‍यावर आल्‍या होत्‍या. त्‍या किनार्‍यावर फिरत असतानाच कुत्रे मागे लागल्‍याने एक बैल उधळला आणि जोरात पळत असताना त्‍याचे शिंग या महिलेच्‍या पायाला लागले.

तिला दक्षिण गोवा इस्‍पितळात आणल्‍यानंतर तिच्‍या पायाला पाच टाके घालण्‍यात आले. ही महिला आता बरी असल्‍याची माहिती जिल्‍हा इस्‍पितळाच्‍या सुत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT