Quepem News Dainik Gomantak
गोवा

Quepem News : उगेत जिलेटिनचे तब्बल ५० खोके; पोलिसांची दिशाभूल

Quepem News : परवानगीविना वाहतूक, खाणीतही स्फोटकांचा वापर

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem News

सावर्डे व सांगे भागात अनेक दगडाच्या खाणी असून खडी क्रशरवर मोठ्या प्रमाणात दगड पुरविण्यासाठी जिलेटिनचा वापर करण्यात येतो.

काही महिन्यांपूर्वी सावर्डे भागात गुन्हा अन्वेषण विभागाने अशीच कारवाई करून दोघांना अटक केली होती.

उगेत दगडाच्या खाणी असून दगड फोडण्यासाठी जिलेटिनचा वापर केला जातो. पण यावेळी जिलेटिनचे तब्बल पन्नास खोके तेही  पोलिसांची दिशाभूल करून आणण्यात आल्यामुळे उगे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काल या स्‍फोटकांचा वापर करून पाचशे स्फोट केले आणि एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड फोडले, असेही सांगण्‍यात येत आहे.

प्रशासनाच्या नजरेआड इतक्या मोठ्या प्रमाणावर जिलेटिनचा साठा राज्यातील सीमा ओलांडून उगेत गुरुवारी पहाटेच्या अंधारात दाखल झाला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्‍या या स्फोटकांचा वापर दहशतवादी कृत्यासाठीही केला जाऊ शकतो. उगे येथील जागृत रहिवाशांमुळे हा प्रकार उघडकीस आला असून संपूर्ण गाव दहशतीच्या छायेत आहे.

उगे येथील स्फोटकांविषयी पोलिसांना चुकीची माहिती देण्यात आली असून खाणीवर स्फोट घडवून आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी सुद्धा घेण्यात आलेली नाही, अशी माहिती उघड होत आहे.

पोलिसांना चकवा!

पाच किलोमीटर परिसरात असलेले साळावली धरण, उगेच्या लोकवस्तीचा भाग आणि अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेले राखीव वनक्षेत्र अशा संवेदनशील परिसरात तब्बल १२५० जिवंत जिलेटिन आणी डेटोनेटर्स उतरून खडीच्या खाणीत तब्बल पाचशे स्फोट घडवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

सांगे पोलिसांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केल्यानंतर शुक्रवारी सकाळी काम फत्ते करून त्या गाड्या पुन्हा रत्नागिरीला रवाना झाल्या आहेत. त्यांना चकवा देऊन त्या गाड्या पसार झाल्या आहेत. उपयोग झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT