Uday Madakaikar Gomantak Digital Team
गोवा

Uday Madakaikar : मशीन बंद; पैसा कोणाला?

उदय मडकईकर : विनापावती गोळा केला जातोय सोपो

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : गेल्‍या दोन वर्षांपासून पणजी मार्केटमध्ये दररोज सोपो कर विनापावती घेतला जात आहे. दररोज सात हजार रुपयांप्रमाणे महिन्याला 2 लाख 10 हजार रुपये कर संकलित होत आहे. म्‍हणजेच वर्षाकाठी 25 लाखांपेक्षा अधिक रुपये होतात.

गेली दोन वर्षे जर अशाप्रकारे कर संकलित झाला असेल, तर 50 लाखांवरील रक्कम गेली कुठे? असा सवाल माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना उपस्थित केला. मडकईकर म्हणाले की, पणजी मासळी मार्केटजवळ रस्त्याच्या बाजूला व मार्केट इमारतीच्‍या बाहेर सकाळी 6 ते 9 या वेळेत तिसवाडीतील अनेक विक्रेते भाजीपाला व मासळी विक्रीसाठी येतात.

आपण महापौर असताना त्यांच्याकडून दररोज सात हजार रुपये कर दररोज येत होता. त्यासाठी आम्ही संबंधित पर्यवेक्षकास मशीन दिले होते. आता दोन वर्षांपासून जर ते मशीन बंद असेल तर महानगरपालिकेच्या तिजोरी किती आणि अन्‍य कोणाच्या खिशात किती पैसे गेले? हा एक प्रश्‍न आहे. दोन वर्षांचा महसूल पाहिला तर 50 लाखांच्यावर ही रक्कम होते, जी महानगरपालिकेच्या तिजोरीत येणे अपेक्षित आहे. परंतु ती कोणाच्या तरी खिशात जात असल्याचे दिसते. यावरून महानगरपालिकेत घोटाळा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

‘ते’ मशीन गेले कोठे?

कोणाते खिसे गरम केले जात आहेत, हे आता तपासणे आवश्‍यक आहे. नगरसेवक, आयुक्त, अधिकारी, महापौर, उपमहापौर असा एक व्हॉट्स-ॲप ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये विनापावती गोळा केला जात असलेल्या सोपो कराचा व्हिडिओ अपलोड केला आहे. आयुक्तांनी संबंधिताविरोधात पोलिस तक्रार द्यावी, त्याची चौकशी करावी अशी मागणी आपण केली आहे.

आपण महापौर असताना सोपो कर गोळा करण्यासाठी बाजार समितीने मशी‍न आणली होती. सोपो गोळा केला की मशिनची पावती दिली जात होती. त्यानंतर त्या मशिनचे काय झाले कोणास ठाऊक? या प्रकरणात जो कोणी आहे, त्याची आमदार, महापौर आणि आयुक्तांनी दखल घ्यावी, अशी मागणी मडकईकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT