Uday Bhembre on Romi Konkani Dainik Gomantak
गोवा

Romi Konkani : कोकणी परिषद गप्प का? अ‍ॅड. उदय भेब्रेंचे रोमी कोंकणी समर्थकांवर 'टिकास्त्र'

Goa Romi Konkani Language: अखिल भारतीय कोकणी परिषदेचे ३३ वे अधिवेशन उद्या २६ रोजी मडगावात होत आहे. तसेच अखिल भारतीय कोकणी परिषदेसह, कोकणी भाषा मंडळ आणि इतर कोकणी संस्‍थांनी रोमीच्‍या मागणीबद्दल स्‍पष्‍ट भूमिका न घेता गुळमुळीत भूमिका घेणे पसंत केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Uday Bhembre About Romi Konkani

मडगाव: साहित्‍य अकादमीच्‍या पुरस्‍कारासाठी किंवा राजभाषा कायद्यात रोमीचा विचार करावा ही जी मागणी होत आहे तीच मुळात चुकीची आहे आणि महत्त्वाचे म्‍हणजे अखिल भारतीय कोकणी परिषदेच्‍या ‘एक भाषा, एक लिपी, एक समाज’ या धोरणाच्‍या विरोधात आहे. अशा परिस्‍थितीत ही मागणी झाल्‍यावर कोकणी परिषदेच्‍या एकाही सदस्‍याने यासंबंधी अजूनही ठोस भूमिका न घेणे हे चुकीचे आहे. ‘रोमी’बद्दल कोकणी परिषद गप्प का? असे मत अखिल भारतीय परिषदेचे माजी अध्‍यक्ष उदय भेंब्रे यांनी व्‍यक्‍त केले.

अखिल भारतीय कोकणी परिषदेचे ३३ वे अधिवेशन उद्या २६ रोजी मडगावात होत आहे. तसेच अखिल भारतीय कोकणी परिषदेसह, कोकणी भाषा मंडळ आणि इतर कोकणी संस्‍थांनी रोमीच्‍या मागणीबद्दल स्‍पष्‍ट भूमिका न घेता गुळमुळीत भूमिका घेणे पसंत केले आहे. या पार्श्वभूमीवर भेंब्रे यांची ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्या ‘साश्टीकार’ कार्यक्रमात ‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी आज ही मुलाखत घेतली. त्‍यावेळी त्‍यांनी आपली मते स्‍पष्‍टपणे मांडली.

कोकणी भाषा मंडळाने ‘ग्‍लोबल कोकणी फोरम’च्‍या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आहे याबद्दल त्‍यांचे मत विचारले असता, ‘ग्‍लोबल कोकणी फोरम’ने ज्‍या तीन मागण्‍या केल्‍या आहेत, त्‍या कोकणी भाषा मंडळही पूर्ण करू शकणार नाही आणि कोकणी परिषदही. कारण या मागण्‍या एक तर गोवा सरकारने पूर्ण करायच्‍या आहेत किंवा साहित्‍य अकादमीने. त्‍यामुळे फोरमला हे चर्चेचे आमंत्रण का दिले गेले तेही समजू शकत नाही. कदाचित या पदाधिकाऱ्यांमध्‍येही पूर्वीच्‍या घटनांविषयी अज्ञान असेल. त्‍यातूनच हे असे आमंत्रण पुढे आले असेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

‘राजभाषा कायद्यात रोमीची मागणी चुकीची’

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपीठाने रोमी व मराठी यांना राजभाषा कायद्यात स्‍थान मिळावे यासाठी दाखल केलेल्‍या रिट याचिका यापूर्वी फेटाळून लावल्‍या आहेत. मुख्‍य म्‍हणजे, या निकालांना सर्वोच्‍च न्‍यायालयात कुणी आव्‍हानही दिलेले नाही. त्‍यामुळे रोमी किंवा कानडी लिपी यांना साहित्‍य अकादमीत स्‍थान मिळावे अशी मागणी करणे चुकीचे आहे, असे भेंब्रे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Degree Controversy: मोदींची पदवी गुलदस्त्यातच, दिल्ली हायकोर्टाने CIC चा आदेश केला रद्द

Horoscope: हरतालिका तीज विशेष, शिव-पार्वतीचा आशिर्वाद 'या' 3 भाग्यवान राशींना, धनसंपत्ती लाभणार

Goa Matoli Vendors: माटोळी बाजारात 'सोपो'चा गोंधळ! जबरदस्‍तीने वसुली, विक्रेत्यांनी सरकारच्‍या नावाने मोडली बोटे

BJP Poster War: रुमडामळमध्‍ये 'पोस्टर वॉर', भाजपचे दोन गट भिडले! पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

Goa Politics: कामत, तवडकर बिनखात्याचेच; पाच दिवस उलटले, खाते वाटपास आणखी विलंब शक्य‍

SCROLL FOR NEXT