Two youths killed in accident at Sancoale Woman injured Dainik Gomantak
गोवा

सांकवाळ येथे अपघातात दोन तरुण ठार; महिला जखमी

अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी

दैनिक गोमन्तक

वास्को : सांकवाळ येथे बिटस् पिलानी महाविद्यालयाजवळ रविवारी रात्री दुचाकी आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सडा येथील एक आणि बोगदा येथील एक असे मिळून दोन तरुण ठार झाले, तर एक पादचारी महिला गंभीर जखमी झाली.

मुरगावचे उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगदा येथील अखिलेश गावस (18) आणि सडा येथील गौतम केळुसकर (19) अशी दोन मृत तरुणांची नावे आहेत.

हे दोघे तरुण केटीएम दुचाकीवरून (जीए 03एसी 6622) एमईएस महाविद्यालयाकडून वेर्णाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी एक खासगी प्रवासी बस (जीए 08 वी 1383) देखील त्याच दिशेने जात होती. बस बिटस् पिलानी महाविद्यालयाजवळ यू टर्न घेत असताना दुचाकीची थेट बसला धडक बसली. अपघातानंतर (Accident) दुचाकीने एका पादचारी महिलेला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उपजिल्हा रुग्णालयात (hospital) नेत असताना वाटेतच मृत्यू (death) झाला. जखमी महिलेला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. याप्रकरणी वेर्णा पोलीस अधिक तपास करत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT