Anjuna Crime Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime : हणजुणेत महिलेचा विनयभंग; शिवीगाळ आणि मारहाणही...

दोन तरूणांना अटक, एक जण परप्रांतीय, पोलिसांनी कारदेखील केली जप्त

Akshay Nirmale

Anjuna Crime: दक्षिण गोव्यात मडगाव येथील एका महिलेला दोघा गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर गोव्यातील हणजुणे (Anjuna) येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी हणजुणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

पोलिसांनी दोन संशयित तरूणांना अटक केली आहे. नौमान कावेश साबरी (वय 23) आणि राज शिंदे (28) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तक्रारीत म्हटले आहे की, या दोघांनीही संबंधित महिलेला स्पर्श केला. तिला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले.

या महिलेला साबरी आणि शिंदे याने शिवीगाळदेखील केली. हणजुणे पोलिसांनी साबरी आणि शिंदे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडील आय ट्वेंटी कार (GA 03 Y 3399) देखील जप्त करण्यात आली आहे.

नौमान साबरी हा मूळचा जयंतीनगर, रायपूर, छत्तीसगड येथील आहे. तर राज शिंदे हा बार्देश येथील आहे. दोघांनीही महिलेला वाईट उद्देशाने स्पर्श केला. तिला खाली पाडले आणि तिच्यावर हल्ला केला. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हणजुणेतील पोलिस उप निरीक्षक धीरज देवीदास या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Indians: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! महेला जयवर्धनेनं सोडलं मुख्य प्रशिक्षकपद; IPL 2027 आधी मोठा बदल

Organic Agriculture: गोव्यात 10 टक्के क्षेत्रातही सेंद्रिय शेती नाही! रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगत उदय प्रभुदेसाई यांचे आवाहन

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT