Goa IMD Rain Forecast: राज्यात शुक्रवारी, शनिवारी वादळी पावसाची शक्यता

गोवा वेधशाळेचा अंदाज
Goa IMD Rain Forecast
Goa IMD Rain ForecastDainik Gomantak
Published on
Updated on

Goa IMD Rain Forecast: उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात शुक्रवार आणि शनिवारी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर्वेकडील वाऱ्यांमुळे ढगांचा समुह तयार झाला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता, गोवा वेधशाळेने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) पणजी केंद्रातील शास्त्रज्ञ राजश्री व्ही. पी. एम. यांनी ही माहिती दिली आहे.

Goa IMD Rain Forecast
Goa Child Pregnancies: धक्कादायक! गोव्यात अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेत वाढ; महिन्याला 'इतकी' प्रकरणे उघड

IMD ने बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, कडक उन्हाचा तडाखा असतानाही अनेक दिवसांपासून वातावरण तुलनेने आल्हाददायक होते. दोन दिवस हवामान कोरडे राहणार असले तरी बुधवारी सकाळी काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे.

7 एप्रिल रोजी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी, IMD, पणजी येथे किमान तापमान 20 अंश सेल्सिअस-साधारणपेक्षा साडेचार अंश कमी नोंदवले गेले. शहराच्या मध्यवर्ती भागात तापमानाचा पारा एक-दोन अंशांनी खाली येण्याची शक्यता आहे.

Goa IMD Rain Forecast
Unemployment in Goa: गोवा सर्वाधिक साक्षर, पण बेरोजगारीतही आघाडी; देशात 'या' क्रमांकावर

सोमवारी हवामान केंद्रात 33 अंश सेल्सिअस आणि मंगळवारी 32.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यामुळे कमाल तापमानदेखील सामान्य मर्यादेत आहे.

मार्च 2023 मध्ये, पहिल्या पंधरवड्यातील बहुतेक दिवस कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. परंतु वाऱ्याच्या दिशेत बदल झाल्यामुळे दुसऱ्या पंधरवड्यात पारा सामान्य मर्यादेत खाली आला, तर किमान तापमान साधारण महिनाभर सामान्य राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com