Verna IDC Dainik Gomantak
गोवा

Verna IDC: गोव्यातील सिप्ला कंपनीत अपघात; सांगली, कोल्हापुरातील दोन कामगारांचा गुदमरुन मृत्यू

Verna IDC, Goa: मूळ सांगली आणि कोल्हापूरचे असणारे दोघे कोन्सुआ, कुठ्ठाळी येथे वास्तव्यास होते.

Pramod Yadav

गोव्यातील वेर्णा औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला कंपनीत अपघात झाला असून, यात महाराष्ट्रातील दोन कामागारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि. २५ जुलै) ही घटना उघडकीस आली. कंपनीच्या बॉयलर प्लांटमध्ये काम करत असताना क्रशर दुरुस्ती करण्यासाठी गेले असता दोघेही अस्वस्थ होऊन खाली कोसळले.

अक्षय भीमराव पवार (24, रा. सांगली) आणि अक्षय विठ्ठल पाटील (27, रा. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या दोघांचे नाव आहे.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पवार आणि अक्षय पाटील दोघेही वेर्णा येथील सिप्ला कंपनीत काम करत होते. मूळ सांगली आणि कोल्हापूरचे असणारे दोघे कोन्सुआ, कुठ्ठाळी येथे वास्तव्यास होते.

गुरुवारी बॉयलर प्लांटमध्ये काम करत असताना त्यांना क्रशर मशीन दुरुस्तीसाठी एलिवेटर पिटमध्ये जावे लागले.

एलिवेटर पिटमध्ये गेल्यानंतर दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. काही वेळानंतर दोघेही खाली कोसळले. दोघांना उपचारासाठी दक्षिण जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 194 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वेर्णा पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT