जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बीचवर मद्यपान भोवले, साडेचार लाखांचा दंड वसूल

Goa Beach: गोव्यात खुल्या जागेत तसेच, समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करण्यास कायद्याने बंदी आहे. असे केल्यास दंडात्मक कारवाईची तरदूत आहे.
जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बीचवर मद्यपान भोवले, साडेचार लाखांचा दंड वसूल
Drinking At BeachDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात मौजमजा करण्यासाठी आलेले पर्यटक बऱ्याचवेळा उत्सहाच्या भरात विविध नियमांचे उल्लंघन करतात. नियमांना धाब्यावर बसवून हुल्लबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिस दंडात्मक कारवाई करत असतात.

अशाच प्रकारे बीचवर मद्यपान करणाऱ्या २२२ पर्यटकांवर गोवा पोलिसांनी दंडात्मक कारवाई करुन चार लाख चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पर्यटनंत्री रोहन खंवटे यांनी याबाबत विधानसभेत उत्तर देले. हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. 2023 आणि 2024 या काळात समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करणाऱ्या २२२ पर्यटकांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून चार लाख चाळीस हजार रुपये वसूल केल्याची माहिती खंवटे यांनी सभागृहाला दिली.

यामध्ये देशी पर्यटकांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. कळंगुट १०७, कांदोळी ०४, बागा १०४ पर्यटकांवर कारवाई करण्यात आली. २०२३ मध्ये १५८ तर २०२४ मध्ये ६३ पर्यटकांवर कारवाई केल्याची माहिती पर्यटनमंत्री खंवटे यांनी दिली.

गोव्यात खुल्या जागेत तसेच, समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करण्यास कायद्याने बंदी आहे. असे केल्यास दंडात्मक कारवाईची तरदूत आहे.

जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बीचवर मद्यपान भोवले, साडेचार लाखांचा दंड वसूल
Goa Assembly: दक्षिण जिल्हा रुग्णालयात खासगी वैद्यकीय महाविद्यालय होऊ देणार नाही; विरोधक सभापतींच्या हैदात

आमदार कार्लुस फेरेरा यांनी समुद्रकिनाऱ्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत का? याबाबत विचारणा केली.

दरम्यान, समुद्रकिनारी आयआरबी कर्मचारी तैनात करण्याचा विचार केला जात असून, हे कर्मचारी समुद्रकिनाऱ्यावरील अवैध घडामोडींवर लक्ष ठेवतील, असे खंवटे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com