Beating Student Dainik Gomantak
गोवा

वहीची दोन पाने फाडल्याने शिक्षिकेला आला राग; चौथीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण, दोन शिक्षिकांवर पोलिसांत गुन्हा

Camurlim School: मुलाच्या शरीरावर वळ उमटले आहेत; जखम आणि रक्तस्रावही झालेला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Camurlim School Incident

म्हापसा: कामुर्ली येथील एका प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोन शिक्षिकांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

ही घटना सोमवारी (ता.२) सकाळी घडली. विद्यार्थ्याने वहीची दोन पाने फाडल्याचा राग आल्याने संतप्त शिक्षिकेने या पीडिताला बेदम मारहाण केली. या मुलाच्या शरीरावर वळ उमटले आहेत. याप्रकरणी विद्यार्थ्याचे वडील हे फिर्यादी आहेत. पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १२६(२), ३५१(२) व ३(५) तसेच गोवा बाल कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

कोलवाळ पोलिसांच्या माहितीनुसार, कामुर्ली येथील एका खासगी प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने जबर मारहाण केली. तिने स्टीलच्या पट्टीने मुलाच्या हाता-पायावर तसेच पाठीवर मारहाण केली.

त्यामुळे मुलाच्या शरीरावर वळ उठले असून तो जखमी झाला आहे. ही शिक्षिका मराठी आणि गणित शिकविते, तर दुसरी संशयित शिक्षिका ही इंग्रजी आणि परिसर विषय शिकविते. या शिक्षिकांची नावे सुजल गावडे (रा. वेरे, बार्देश) आणि कनिषा गडेकर (रा. पीर्ण, बार्देश) असे आहे.

धक्कादायक म्हणजे, या घटनेनंतर संशयित शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांना स्वतः फोन करून, ‘मी तुमच्या मुलाला मारले’, असे सांगितले होते. ही मारहाण साधीसुधी नसून, अमानुष असल्याचे वडिलांना त्यांचा मुलगा घरी परतल्यानंतर समजले. नंतर पीडित मुलाच्या वडिलांनी कोलवाळ पोलिस स्थानकात या शिक्षिकांविरुद्ध लेखी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी या दोन शिक्षिकांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

शिक्षिकेची आज होणार चौकशी

या शिक्षिकेला कोलवाळ पोलिसांनी चौकशीसाठी बुधवारी सकाळी १०.३० वाजता बोलावले आहे. मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष यांना ११ वाजता चौकशीसाठी शिक्षण संचालकांनी बोलावले आहे. याआधी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी शिक्षिका आणि मुख्याध्यापकांना शिक्षण संचालकांसमोर चौकशीसाठी बोलावल्याची माहिती दिली होती.

शाळेत नेमके काय घडले...

१) या विद्यार्थ्याने स्वत:च्याच वहीमधील दोन पाने फाडली होती.

२) त्यानंतर एका शिक्षिकेने जाऊन स्टीलची पट्टी आणली आणि मुलगा वर्गाबाहेर पळून जाणार नाही, याची दक्षता घेतली.

३) नंतर दुसऱ्या शिक्षिकेने मुलाच्या हातावर, पायावर, पाठीवर, मांड्यांवर पट्टीने जबर मारहाण केली.

४) यात तो जखम झाला आणि रक्तस्रावही झाला. यामुळे त्याच्या शरीरावर सूज आली आहे.

५) तसेच चेहऱ्यावर थप्पड आणि पोटावर लाथ मारून मुलाला जबर मारहाण केली. मुलाचा चेहरा पकडून त्याला फळ्यावर लोटले.

६) शिक्षिकेने फिर्यादीच्या चुलत बहिणीच्या मुलाला धमकी दिली की, या घटनेची बाहेर वाच्यता करू नकोस. हा विद्यार्थी याच शाळेतील इयत्ता तिसरीत शिकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांना अखेरची मानवंदना! गोव्यात तीन दिवसांचा दुखवटा, एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ravindra Bhavan: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रवींद्र भवनचे सभागृह होणार खुले, मंत्री कामत यांनी दिली माहिती

Goa AAP: सासष्टीत 9 मतदारसंघांत ‘आप’ देणार उमेदवार! काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याची तयारी; गोवा फॉरवर्डही रिंगणात

नव्वदमध्ये गोव्यातील गुन्हेगार रवींच्या नावाने थरथर कापत होते; महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता दबदबा

अग्रलेख: दरोडेखोरांना गोव्‍यात साह्य कुणी केले?

SCROLL FOR NEXT