Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: अपघातांचे सत्र थांबेना; बांबोळीत दोन भरधाव कार धडकल्या

गती मर्यादा घालण्याची नागरिकांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु असून एकाच दिवशी तीन - तीन व्यक्ती अपघातात दगावल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज खुरीस, बांबोळी येथे दोन भरधाव कारमध्ये धडक झाल्याची घटना घडली आहे.

(Two speeding cars have collided in Bamboli)

मिळालेल्या माहितीनुसार तिसवाडी तालुक्यातील खुरीस, बांबोळी येथे दोन कारमध्ये धडक झाली आहे. या अपघातातील जखमींची माहिती मिळाली नाही. मात्र या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बांबोळी येथे मुख्य रस्त्यावर दोन कारमध्ये धडक झाली आहे. चालकास रस्त्याचा अंदाज आला नसल्याने हा अपघात झाला असल्याचं म्हटले आहे. या रस्त्यावर पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी वाहनांवर गतीची मर्यादा घालणे आवश्यक असल्याचं म्हटले आहे.

दरम्यान भरधाव वेगाने पंचवाडी येथील अपघातात सांगेचा युवक ठार झाला असल्याची घटना एक दिवसापुर्वीच घडली आहे. शशी गावकर (वय 25) हा सावर्डे तालुक्यातील पंचवाडी मुख्य मार्गाने प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान मापा (Mapa Panchwadi ) येथे आला असता गावकर याचा अपघात झाला. या अपघातात गावकर याचा दुचाकीवरील ताबा सुटला त्यामूळे दुचाकी मुख्य मार्ग सोडत मार्गालगतच्या खड्ड्यात वेगाने आदळली. यात तो मृत्यू पावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

West Nile Virus: वेस्ट नाईल व्हायरसने जगभरात वाढवली चिंता! लहान मुलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

SCROLL FOR NEXT