old goa police station Dainik Gomantak
गोवा

जुने गोवे ठाण्यामध्ये दोन पोलिसांमध्ये जुंपली

दोघांचे निलंबन: दखलपात्र गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

पणजी: जुने गोवे पोलिस स्थानकात दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी एकमेकाला मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिस निरीक्षकांनी या दोघांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. जुने गोवे पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्युलिओ दिनीझ आणि पोलिस हवालदार समीर फड़ते यांच्यात आज संध्याकाळी सुरुवातीला बाचाबाची झाली होती.

त्यानंतर त्याचे पर्यवसान एकमेकांना मारहाण करण्यामध्ये झाले. मारहाणीच्या प्रकरणानंतर समीर फडते हा पोलिस स्थानकातून निघून गेला, तर ज्युलिओ याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ड्युटीवर असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू होता. त्यांच्यात अधूनमधून खटके उडत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: केळशी हादरली! विहिरीत आढळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; गळ्यात आढळली दोरी, संशयाची सुई खुनाच्या दिशेने?

Meta Smart Glasses: "सावधान! तुमचे खाजगी क्षण कोणीतरी पाहतंय!" मेटा चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ होतायत लीक; केनियातील डेटा वर्कर्सचा धक्कादायक खुलासा

Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT