Goa Accidents Death in 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच; आणखी दोघा तरुणांचा मृत्यू

Goa Accident Death: डुलकी लागल्याने त्‍याचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकीने दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यात गजाननचा मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: जुने गोवे येथील राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडेपाचच्‍या सुमारास झालेल्या स्वयंअपघातात दुचाकीस्‍वार गजानन उसगावकर (३२, रा. खोर्ली) या युवकाचा मृत्यू झाला. तर, खांडेपार येथे आज रात्री आठच्‍या सुमारास टेम्‍पो व दुचाकी यांच्‍यात‍ झालेल्‍या अपघातात दुचाकीस्‍वार सुरेश नाईक (रा. कुर्टी) हे ठार झाले.

दुचाकीची दुभाजकाला जोरदार धडक

गजानन उसगावकर हा आपल्या दुचाकीवरून पणजीहून खोर्लीच्या दिशेने येत होता. हॉटेल कदंब फर्न्सजवळ पोहोचल्यावर उतरणीवर असलेल्या वळणावर डुलकी लागल्याने त्‍याचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकीने दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यात गजाननचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घटस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गजाननने हेल्मेट परिधान केले होते, परंतु शरीराला गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबाच्‍या ताब्‍यात देण्‍यात आला. दुसऱ्या अपघातात भरधाव वेगातील टेम्‍पोने धडक दिल्‍यामुळे खांडेपार येथे सुरेश नाईक यांना आपला जीव गमवावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT