Bondla Wildlife Sanctuary Dainik Gomantak
गोवा

Bondla Wildlife Sanctuary: बोंडलात येणार दोन अस्वल, दोन गवे जाणार मध्य प्रदेशला

दोन गव्यांच्या बदल्यात बोंडला प्राणीसंग्रहालयाला दोन अस्वल दिले जातील.

Pramod Yadav

Bondla Wildlife Sanctuary: गोव्यातील बोंडला प्राणीसंग्रहालयातून मध्य प्रदेशातील वनविहार राष्ट्रीय उद्यानात दोन गवे पाठवले जाणार आहेत. त्यापैकी एक नर आणि एक मादी गवा असेल.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात गव्यांची रवानगी केली जाणार आहे. यामुळे भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय उद्यानातील गव्यांची संख्या दोनवरून चार होईल. दोन गव्यांच्या बदल्यात बोंडला प्राणीसंग्रहालयाला दोन अस्वल दिले जातील. अशी माहिती समोर आली आहे.

भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय उद्यानात दोन गवे आहेत, दोघेही नर असल्यामुळे त्यांची संख्या वाढत नाही. त्यामुळे भोपाळच्या उद्यान व्यवस्थापन व वन्यजीव विभागाचे अधिकारी दुसऱ्या प्राणीसंग्रहालयातून गवे आणण्यासाठी प्रयत्नशील होते.

दरम्यान, गोव्यातील बोंडला प्राणीसंग्रहालयात गवे असल्याची माहिती मिळाली. यानंतर बोंडला प्राणिसंग्रहालयाकडून गव्यांची मागणी करण्यात आली होती. यावर आता दोघांचे एकमत झाले असून, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने देखील याला परवानगी दिली आहे.

दरम्यान, भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय उद्यानात काही वन्यप्राण्यांची कमतरता आहे, त्यासाठी विविध राज्यांच्या प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाशी संपर्क साधला जात आहे. वन्यजीव विनिमय कार्यक्रमांतर्गत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या उद्यानात गवे आणण्यास परवानगी मिळाली आहे.

गोव्यातून गवे घेऊन जाण्यासाठी लवकरच एक टीम रवाना होणार आहे. या टीममध्ये डॉक्टरांचा देखील समावेश असून, सुरूवातीला गव्यांच्या आरोग्याच्या काही आवश्यक चाचण्या केल्या जातील आणि अहवाल आल्यानंतर स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच गोव्याला दोन अस्वल देण्याची प्रक्रियाही याचवेळी सुरू होणार आहे. अशी माहिती भोपाळमधून समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT