brutal Fight Dainik Gomantak
गोवा

Shiroda Crime News : शिरोड्यात दोन गटांत मारामारी; दोघा संशयितांना अटक

जखमींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda Crime News : काराय- शिरोडा येथे दोन गटांत मारामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून मारहाणीत गंभीर जखमी एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तीघा जखमींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

याबाबत फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास काराय-फोंडा येथे एका दारुच्या दुकानाबाहेर दोन गटांत मारामारी झाली. यात  दोघांनी दारूच्या नशेत 4 जणांना मारहाण केली.

याबाबतची तक्रार दाखल होताच फोंडा पोलिसांनी संशयित अक्षय रमेश नाईक व रवीकुमार काळू गोसावी (पंडेगाळ- शिरोडा) या दोघांना अटक केली. मारहाणीत गंभीर जखमी शोधन नाईक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून कार्तिक नाईक, जयेश नाईक व सुजय नाईक या जखमीवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. 

याप्रकरणी निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT